श्रीलंकेच्या दिग्गज फिरकीपटूने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

परेरा हा श्रीलंकेच्या कसोटी संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्डही जोरदार आहे.
Dilruwan Perera
Dilruwan PereraDainik Gomantak
Published on
Updated on

कोलंबो: श्रीलंकेचा ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलरुवान परेराने आज बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 39 वर्षीय दिलरुवानने आपल्या निर्णयाची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांना ईमेलद्वारे दिली. परेरा हा श्रीलंकेच्या कसोटी संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्डही जोरदार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार आहे. (Dilruwan Perera announces retirement)

या ऑफस्पिनरने आपल्या गोलंदाजीने जगातील दिग्गज फलंदाजांना चॅलेंज केले आहे. तो श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 आणि 100 बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील 11व्या आणि 25व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी दाखवली आहे. गोलंदाजीसोबतच तो चांगला फलंदाजही होता. त्याने श्रीलंकेसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. श्रीलंकेसाठी कसोटी सामन्यात 10 बळी घेणारा तसेच अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू होता.

Dilruwan Perera
योगदान देत गेलो, बहुमान मिळत राहिले : ब्रह्मानंद शंखवाळकर

2007 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली

परेराने 2014 मध्ये शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीतून पदार्पण केले होते. याच्या सात वर्षांपूर्वी 2007 मध्ये त्याने कोलंबोमध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता. 2011 मध्ये, त्याला त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना पल्लिकले येथे खेळण्याची संधी मिळाली. 2018 मध्ये दुबईत तो शेवटचा श्रीलंकेकडून खेळताना दिसला होता.

अशी गाजवली परेराने आपली कारकीर्द

परेराने आपल्या कारकिर्दीत श्रीलंकेसाठी 43 कसोटी, 13 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 35.90 च्या सरासरीने आणि 3.20 च्या इकॉनॉमीने 161 बळी घेतले होते. 78 धावांत 10 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, तो दोनदा कसोटीत 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्यात यशस्वी झाला. 13 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स आणि 2 टी20 मध्ये 3 विकेट्स परेराने घेतल्या.

Dilruwan Perera
PSL 2022 सुरु होण्यापूर्वीच कराची स्टेडियमला आग, कॉमेंट्री बॉक्स जळून खाक !

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 800 हून अधिक विकेट

निवृत्तीची घोषणा करताना परेरा म्हणाला, "क्रिकेटच्या सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळू शकलो, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मी क्रिकेटला खूप चांगल्या आठवणीसह आनंदाने निरोप देतो आहे." तो सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 200 हून अधिक सामन्यांमध्ये जवळपास 800 बळी घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com