Sreesanth vs Gambhir: 'तो मिस्टर फायटर, मला फिक्सर म्हणून...', व्हिडिओ शेअर करत श्रीसंतचे गंभीरवर खळबळजनक आरोप

Sreesanth and Gautam Gambhir Fight: श्रीसंतने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गंभीरबरोबरील वादाचे कारण सांगत खळबळजनक आरोप केले आहेत. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घ्या.
Sreesanth and Gautam Gambhir Fight
Sreesanth and Gautam Gambhir FightInstagram
Published on
Updated on

Sreesanth reveals details on argument with Gautam Gambhir during Legends League match :

क्रिकेट मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये भांडणे होत असतात, पण बऱ्याचदा ही भांडणे मैदानापूरतीच मर्यादीत असतात. मात्र, नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यातील मैदानातील झालेल्या बाचाबाचीचे पडसाद मैदानाबाहेरही उमटल्याचे दिसून येत आहे.

सध्या भारतात लीजंड्स लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी (6 डिसेंबर)इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनिटेरचा सामना झाला. पण हा सामना श्रीसंत आणि गंभीर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे चर्चेत राहिला.

त्यानंतर श्रीसंतने दोन व्हिडिओही शेअर केले. एक व्हिडिओ सामन्यानंतरचा बुधवारी रात्री पोस्ट केलेला आहे, ज्यात त्याने गंभीरवर भांडखोर असल्याचा आरोपही केला. दरम्यान, श्रीसंतने या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केले नाही की गंभीरबरोबर त्याची सामन्यात वाद झाले की नाही किंवा जरी झाले असेल, तरी त्यामागील कारण काय होते.

मात्र, गुरुवारी सकाळी त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याने गंभीर त्याला काय म्हणाला, याबद्दल खुलासा केला आहे.

Sreesanth and Gautam Gambhir Fight
S Sreesanth: श्रीसंतचा 'तो' जबरदस्त सिक्स अन् भन्नाट सेलिब्रेशन, ना चाहते विसरले, ना खेळाडू; Video

श्रीसंतने इंस्टाग्रामवर बुधवारी रात्री सामन्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गंभीरचा मिस्टर फायटर असा उल्लेख करताना म्हटले आहे की 'मिस्टर फायटरबरोबर काय झाले, याबद्दल काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. तो नेहमीच त्याच्या सहकाऱ्यांशीही भांडत असतो. त्यासाठी कोणतेही कारण नसते.'

'तो सिनियर खेळाडूंचाही मान ठेवत नाही, अगदी विरू भाईचाही. तेच आजही झाले. कोणत्याही प्रकारे डिवचले नसतानाही, तो मला काहीतरी सातत्याने म्हणत होता, जे खूप उद्धट होते, ते मिस्टर गौतम गंभीरने बोलायला नव्हते हवे.'

श्रीसंत पुढे म्हणाला, 'माझी यात काहीही चूक नव्हती. मला स्पष्ट सर्व सांगायचे आहे. मिस्टर गौतीने जे केले ते लवकरच तुम्हाला कळेल. त्याने क्रिकेट मैदानावर जे शब्द उच्चारले, ते अपेक्षितच नव्हते. माझे कुटुंब, माझे राज्य आणि सर्वजण कठीण गोष्टीतून गेले आहेत. मी तुमच्या पाठिंब्याने माझा लढा दिला. आता लोक कोणत्याही कारणाशिवाय अपमानित करत आहेत.'

त्याचबरोबर श्रीसंतने गंभीरचे भूतकाळात विराट कोहलीबरोबर झालेल्या वादाचेही उदाहरण दिले.

त्याने म्हटले, 'जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांनाचा सन्मान करत नसाल, तर लोकांचे प्रतिनिधित्व करून काय उपयोग आहे. मला फार डिटेल्स द्यायचे नाहीत. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मी, माझे कुटुंब आणि माझ्या जवळचे लोक दुखावले गेले आहेत. मी कोणतेही चुकीचे शब्द वापरले नसतानाही, तो मला बोलतच होता.'

कधी सुरू झाला वाद?

या सामन्यादरम्यान दुसऱ्या षटकात श्रीसंत गोलंदाजी करत होता, त्यावेळी गौतम गंभीर फलंदाजी करत होता. तेव्हा गंभीरने श्रीसंतविरुद्ध दोन सलग चेंडूवर षटकार आणि चौकार मारला. त्यानंतरच्या चेंडूवर गंभीरला धाव करता आली नाही. या षटकादरम्यान, श्रीसंत आणि गंभीर यांच्यातील वादाला सुरुवात झाली.

नक्की काय होते भांडणाचे कारण?

गुरुवारी सकाळी श्रीसंतने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने भांडणाचे कारण सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की तो खूप साधा माणूस असून त्याला चुकीचे समजले जात आहे. गंभीरला योग्य ठरवण्यासाठी त्याचे पीआर काम करत आहेत.

त्याचबरोबर त्याने सांगितले की तो सातत्याने त्याला फिक्सर असे म्हणत होता. याशिवाय श्रीसंतने व्हिडिओमध्ये दावा केला आहे की त्याने गंभीरला कोणताही अपशब्द वापरला नव्हता, मात्र गंभीर त्याला फिक्सर म्हणत होता. ज्यामुळे तो आणि त्याचे कुटुंबिय दुखावले गेले आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्रीसंतवर 2013 आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे श्रीसंतवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. पण त्यानंतर श्रीसंतने बंदीचा कालावधी पुर्ण करत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com