Wrestlers Protest: कुस्तीपटूंना क्रीडामंत्र्यांचं चर्चेसाठी निमंत्रण, पण साक्षी मलिक म्हणतेय...

खासदार ब्रिजभूषण सिंगविरुद्ध आंदोनल करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंशी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर चर्चा करणार आहेत.
Anurag Thakur | Wrestlers Protest
Anurag Thakur | Wrestlers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Anurag Thakur invites protesting wrestlers for discussion: भारताचे पदक विजेते कुस्तीपटू गेल्या अनेक महिन्यांपासून कुस्तीपटू कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध आंदोलन करत आहेत. हे आंदोलनाबाबत भारतभरात सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान आता आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना चर्चा करण्यासाठी केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी निमंत्रण दिले आहे. याबद्दल त्यांनी ट्वीटही केले होते. त्यानंतर आता बुधवारी दुपारी आंदोलनकर्ते कुस्तीपटू आणि अनुराग ठाकूर यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजत आहे. पण याबद्दल साक्षी मलिकने कुस्तीपटूंची भूमिका स्पष्ट केली आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनात बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट असे भारतीय कुस्तीपटू सामील आहेत.

Anurag Thakur | Wrestlers Protest
Wrestlers Protest: ब्रीजभूषण विरुद्ध दोन FIR दाखल! विनयभंग, लैंगिक अत्याचारासह कुस्तीपटूंनी लावले 'हे' आरोप

अनुराग ठाकूर यांनी ट्वीट केले आहे की 'सरकार कुस्तुपटूंशी त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेचे निमंत्रण देत आहे.' यापूर्वी कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा केली आहे.

पण, अनुराग ठाकूर यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्यानंतर साक्षी मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आम्ही आमच्या वरिष्ठांशी आणि समर्थकांशी चर्चा करू. ज्यावेळी सर्वजण प्रस्ताव ठीक आहे, अशी संमती देतील, तेव्हाच आम्ही सहमत होऊ. पण सरकार जे म्हणेल ते आम्ही मान्य करू आणि आमचा विरोध संपवू, असे होणार नाही. बैठकीसाठी अद्याप वेळ निश्चित नाही.'

दरम्यान, यापूर्वी कुस्तीपटूंनी अमित शाह यांच्याबरोबर केलेल्या बैठकीदरम्यान काय चर्चा झाली याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण त्यानंतर 5 जून पासून साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट रेल्वेतील आपापल्या नोकरीत पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र, असे असले तरी न्याय मिळेपर्यंत आंदोलन ते चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Anurag Thakur | Wrestlers Protest
Wrestlers Protest: अमित शाह भेट ते खोट्या बातम्या, गेल्या 48 तासातील 5 महत्त्वाचे मुद्दे

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैगिंक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याचमुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी कुस्तीपटू करत आहेत. काहीदिवसांपूर्वी कुस्तीपटूंनी या प्रकरणात तीव्र भूमिका स्विकारत त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर भारतीय शेतकरी संघाचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना 5 दिवसांची वाट पाहाण्याची विनंती केली होती. कुस्तीपटूंनी स्विकारलेल्या या तीव्र भूमिकेनंतर अमित शाह यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असेही समोर आले आहे की ब्रिजभूषण विरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये सहा ऑलिम्पियन्स खेळाडूंच्या आरोपांचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांचा उल्लेख आहे. एफआयआरमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण विरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com