IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने मार्को यान्सनला पदार्पणाची संधी दिली आहे.
IND vs SA
IND vs SADainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. हा सामना पार्ल येथील बोलंड पार्क मैदानावर होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाला (Team India) एकदिवसीय मालिका जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाची भरपाई करायची आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका (South Africa) कसोटी विजयापासून प्रेरणा घेऊन आत्मविश्वासाने भारताविरुद्ध उतरेल. (IND vs SA ODI Series)

भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना सहा सामन्यांची वनडे मालिका 5-1 ने जिंकली होती. तेव्हापासून मात्र बरेच काही बदलले आहे. तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार होता, पण आता तो फक्त फलंदाज म्हणून खेळणार असून दोन वर्षांपासून सुरु असलेला त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला असून भारतीय टीम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IND vs SA
IND VS SA: 9 धावा अन्…विराटला सजदा करणार क्रिकेट जगत, सचिनचा विक्रम मोडणार!

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, यान्सनचे पदार्पण

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने मार्को यान्सनला पदार्पणाची संधी दिली आहे. कागिसो रबाडा या मालिकेत खेळत नाही.

संघ पुढीलप्रमाणे आहेत-

भारत: केएल राहुल (KL Rahul) (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, कृष्णा चहर, प्रा. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, झुबेर हमझा, मार्को यान्सन, यानेमन मालन, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, अँडीले फेलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, रबरेझ शम्सी. व्हॅन डेर ड्यूस, काइल व्हर्न.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com