Cricketer Retirement : स्टार विकेटकिपरची वनडेतून निवृत्तीची घोषणा, भारतातील वर्ल्डकप 2023 ठरणार अखेरचा

Quinton de Kock Retirement: वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर स्टार यष्टीरक्षकाने वयाच्या 30 व्या वर्षीच वनडेतून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
KL Rahul | Quinton De Kock
KL Rahul | Quinton De KockDainik Gomantak

South Africa wicket-keeper Quinton de Kock will retire from ODI cricket at the end of ICC World Cup 2023 :

भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपसाठी मंगळवारी (5 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेने 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा झाल्यानंतर लगेचच क्विंटन डी कॉकने निवृत्तीची घोषणा केली आहे.

डी कॉकचा आगामी वनडे वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिका संघात समावेश आहे. त्यामुळे तो हा वर्ल्डकप खेळल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेटने माहिती दिली आहे.

30 वर्षीय डी कॉकने यापूर्वीच 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो वनडेमधूनही निवृत्त होणार आहे. असे असले तरी तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तरी खेळत राहिल, अशी दक्षिण आफ्रिकेला आशा आहे.

KL Rahul | Quinton De Kock
भारतीय संघाची World Cup 2023 स्पर्धेसाठी घोषणा! रोहित कर्णधार, तर 'या' 15 खेळाडूंना संधी

डी कॉकने 2013 साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो आत्तापर्यंत १४० वनडे सामने खेळला असून 44.85 च्या सरासरीने 5966 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १७ शतकांचा आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याने २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरियनला त्याची १७८ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. त्याने वनडेत यष्टीरक्षण करताना १८३ झेल पकडले असून १४ यष्टीचीत केले आहेत.

त्याचबरोबर डी कॉकला ८ वनडे सामन्यांमध्ये दक्षिम आफ्रिका संघाचे नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली. या ८ सामन्यांपैकी ४ सामने त्याने जिंकले, तर ३ सामने पराभूत झाले. १ सामन्याचा निकाल लागला नाही.

दरम्यान, वर्ल्डकप २०२३ हा डी कॉकसाठी तिसरा वनडे वर्ल्डकप ठरणार आहे. तो यापूर्वी २०१५ आणि २०१९ साली देखील वनडे वर्ल्डकप खेळला आहे. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत १७ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ४५० धावा केल्या आहेत.

KL Rahul | Quinton De Kock
भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचाही World Cup 2023 साठी संघ घोषित, 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी

डी कॉकच्या निवृत्तीबद्दल दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक हनोक एनक्वे यांनी सांगितले, 'क्विटन डी कॉकने दक्षिण आफ्रिका क्रिकेटची चांगली सेवा केली आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीने एक बेंचमार्क तयार केला. गेले अनेक वर्षांपासून तो संघातील प्रमुख खेळाडू आहे.'

'त्याला नेतृत्वाचीही संधी मिळाली, हा सन्मान खूप कमी खेळाडूंना मिळतो. वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा निर्णय आम्ही स्विकरत आहोत आणि आम्ही त्याचे इतक्या वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो. आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, पण त्याला दक्षिण आफ्रिकेसाठी पुढेही टी२० क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत.'

  • वर्ल्डकप 2023 साठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ - तेंबा बाऊमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किया, कागिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन दर द्युसेन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com