Captain Changed: मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेने बदलला कसोटी कर्णधार, टेंबा बावुमा करणार नेतृत्व

Test Captain Changed of Team SA: भारतीय संघ दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे.
Temba Bavuma
Temba BavumaDainik Gomantak
Published on
Updated on

Test Captain Changed of Team SA: भारतीय संघ दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 263 धावांवर आटोपला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 4 तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाने 3-3 विकेट घेतल्या. या सामन्यादरम्यान क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

संघाने कसोटी कर्णधार बदलला

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने आपला कसोटी कर्णधार बदलला आहे. टेंबा बावुमा आता दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. 28 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणे हे बावुमाचे पहिले काम असेल.

बावुमाने डीन एल्गरकडून पदभार स्वीकारला, ज्याची 2021 च्या मध्यात कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारताविरुद्ध (India) घरच्या मालिकेतील विजयासह त्यांच्या पहिल्या चार मालिका जिंकल्या. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Temba Bavuma
South Africa Cricket: वयाच्या 33 व्या वर्षीच द. आफ्रिकन ऑलराऊंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

बावुमा एकदिवसीय संघाचा कर्णधारही राहील

32 वर्षीय बावुमा वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळणार आहे. तथापि, गेल्या दोन T20 विश्वचषकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गट-टप्प्यामधून बाहेर पडल्यानंतर, त्याने या लहान फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. या कसोटीत बावुमा प्रशिक्षक शुक्री कोनराड यांच्यासोबत काम करेल. बावुमाला आतापर्यंत 54 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि 20 अर्धशतकांसह एकूण 2797 धावा केल्या आहेत.

SA ने सुधारण्याची आशा व्यक्त केली

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक एनोक एनक्वे म्हणाले की, 'आम्हाला विश्वास आहे की तो (बावुमा) आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल. त्याचबरोबर डीन एल्गरनेप्रमाणे संघाला पुढे नेण्यात मदत करेल. तसेच, गेल्या दोन वर्षांतील कर्णधारपदाच्या भूमिकेबद्दल मी डीनचे मनापासून आभार मानू इच्छितो. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये संघाला त्याने चांगले स्थान मिळवून दिले.'

Temba Bavuma
IND vs AUS, 2nd Test: पहिल्या दिवशी शमीचा धडाका, जडेजा-अश्विनही चमकले; कांगारुचंही शेपूट वळवळलं

संघ: टेम्बा बावुमा (क), गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्झी, डीन एल्गर, सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरान मुथुसामी, एनरिच नॉर्टजे, कीगन पीटरसन, कागिसो रॅबटन आणि कागिसो रबाडा .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com