आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी, सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यात स्पर्धा होऊ शकते. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. बार्कले नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चे अध्यक्ष झाले. त्यांनी भारताच्या शशांक मनोहर यांची जागा घेतली, ज्यांनी जुलै 2020 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. (sourav ganguly and jay shah face off in offing for icc new chairman post)
वृत्तानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah)) या दोघांना आयसीसीचे पुढील अध्यक्ष व्हायचे आहे. गांगुली आणि शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत पुढे असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
या दोघांपैकी कोणीही पुढील आयसीसी अध्यक्ष बनल्यास, आयसीसीच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते भारतातील पाचवे अधिकारी असतील. यापूर्वी जगमोहन दालमिया (1997-2000), शरद पवार (2010-2012), एन श्रीनिवासन (2014-2015) आणि शशांक मनोहर (2015-2020) यांनी हे पद भूषवले आहे.
सध्याचे ICC चेअरमन, बार्कले, ऑकलंड येथील व्यावसायिक वकील आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की, व्यावसायिक बांधिलकीमुळे बार्कले यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही आणि अशा परिस्थितीत नोव्हेंबर 2022 मध्ये आयसीसीला नवीन अध्यक्ष मिळू शकतो. आयसीसी अध्यक्षाची निवड दोन वर्षांसाठी केली जाते आणि त्याला सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी वाढवता येत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.