FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये गुरुवारी उरुग्वे विरुद्ध कोरिया रिपब्लिक संघात सामना होणार आहे. या सामन्यात कोरियाचा स्टार फुटबॉलपटू सोन ह्युंग-मिन तोंडाला मास्क घालून मैदानात खेळताना दिसेल, पण तो मास्क नक्की का घालणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान,1 नोव्हेंबर रोजी टॉटनहॅमकडून (Tottenham) चॅम्पियन्स लीगमध्ये खेळताना मार्सेलच्या चान्सेल एमबेम्बाला धडकल्याने 30 वर्षीय सोनच्या (Son Heung-min) डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला काही सामन्यांना मुकावेही लागले.
याच दुखापतीमुळे तो कतारमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup) खेळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण, त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तो त्याच्या कारकिर्दीतील तिसरा वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने यापूर्वी 2014 आणि 2018 साली वर्ल्डकप खेळला आहे.
पण, सुरक्षेचा विचार करूनच तो सामन्यादरम्यान मास्क घालून खेळताना दिसून येणार आहे. याबद्दल सोनने म्हटले आहे की, 'मला वाटत नाही की हे इतके वाईट आहे कारण मी विचार केलेला त्यापेक्षा जास्त मास्क आरामदायी आहे.'
साल 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सोनने कोरियाकडून आत्तापर्यंत 104 सामन्यात मिळून 35 गोल केले आहेत. तो कोरियाच्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने टॉटेनहॅमकडूनही गेल्या काही हंगामांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.