Pakistan Super League: जुनं 'वैर' चांगलंच भोवलं, या दोन खेळाडूंना झाली शिक्षा

सोहेल तन्वीर विरुध्द बेन कटिंग (Sohail Tanvir vs Ben Cutting) यांच्यातील वाद चर्चेत आला आहे.
Sohail Tanvir vs Ben Cutting
Sohail Tanvir vs Ben CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील नेते त्यांच्या हरकतीमुळे सतत चर्चेत असतात. मात्र आता या नेत्यांना मागे सारत पाकिस्तान क्रिकेट चर्चेत आले आहे. क्रिकेट हा खेळ गल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला जातो. (Sohail Tanveer And Ben Cutting Fined By Pakistan Super League)

याच पाश्वभूमीवर पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) काही वेगळेच पाहायला मिळाले आहे. या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या दोन खेळाडूंना त्यांच्या जुन्या शत्रुत्वाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. शिक्षा म्हणून दोघांना मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सोहेल तन्वीर विरुध्द बेन कटिंग (Sohail Tanvir vs Ben Cutting) यांच्यातील वाद चर्चेत आला आहे. मंगळवारी झालेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात ही घटना घडली. हा सामना पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सोहेल क्वेटाच्या संघाचा भाग होता, तर बेन कटिंग (Ben Cutting) हा सामना जिंकणाऱ्या पेशावरकडून खेळत होता.

Sohail Tanvir vs Ben Cutting
एका म्यानात दोन तलवारी! हुड्डा-पांड्यांच्या एकाच टीममध्ये खेळण्यावर गंभीरची प्रतिक्रिया

दरम्यान, आता या सामन्यात असे काय घडले की, दोघांवर दंड ठोठावण्याची वेळ आली, ते जाणून घेऊया... तर हे प्रकरण पेशावर झल्मीच्या डावातील 19 व्या षटकाशी संबंधित आहे. सोहेल तन्वीरच्या (Sohail Tanvir) षटकातील पहिल्या 5 चेंडूत कटिंगने 4 षटकारांसह 27 धावा केल्या. सलग तिसरा षटकार मारल्यानंतर बेन कटिंगने मधल्या बोटाने तनवीरकडे बोट दाखवले. आणि जेव्हा त्याने चौथा षटकार मारला तेव्हा मैदानावर दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर पंचाला हस्तक्षेप करावा लागला.

जुने 'वैर' पुन्हा दिसले तर दंड

पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर म्हणजेच डावाच्या शेवटच्या षटकात नसीम शाह (Naseem Shah) गोलंदाजी करत असताना कटिंगचा फटका थेट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या सोहेल तन्वीरच्या हातात गेला. यावेळी तनवीरने आपले मधले बोट दाखवत कटिंगला बाहेर जाण्याचा इशारा केला.

Sohail Tanvir vs Ben Cutting
Pakistan Super League: सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

मात्र, या दोन खेळाडूंमध्ये अशा प्रकारे भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दोघेही अशा प्रकारे एकमेकांच्या समोर आले होते. तिथेही कटिंगने तनवीरला षटकार मारला होता आणि नंतर तो बाद झाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाने त्याला मधल्या बोटाने इशारा केला. त्यानंतर फक्त सोहेल तन्वीरला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.

दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली, तन्वीरने माफी मागितली

सध्याच्या प्रकरणात दोन्ही खेळाडू दोषी आढळले आहेत. दोघांनी सामनाधिकारी अली नक्वी यांच्यासमोर आपला गुन्हा कबूल केला, ज्याच्या बदल्यात त्यांना मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला. मात्र, सोहेल तन्वीरने सोशल मीडियावर आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com