Smriti Mandhana: स्मृतीचा इंग्लंडमध्येही डंका! विक्रमी 'फिफ्टी' ठोकत केली कोणालाही न जमलेली कामगिरी

The Hundred: स्मृती मानधानाने द हंड्रेड स्पर्धेत ऐतिहासिक फिफ्टी ठोकत दोन विक्रमांना गवसणी घातली आहे.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Mandhana Historical Fifty in The Hundred: इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड महिलांची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत भारताच्या काही क्रिकेटपटूही सामील झाल्या आहेत. यात स्टार फलंदाज स्मृती मानधनाचाही समावेश आहे. मानधना या स्पर्धेतील सगल तिसरा हंगाम साउदर्न ब्रेव्ह या संघासाठी खेळत आहे. दरम्यान, तिने या स्पर्धेत इतिहास रचला आहे.

शुक्रवारी (4 ऑगस्ट) वेल्श फायर आणि साउदर्न ब्रेव्ह या संघात साउथँम्पटनला सामना झाला. या सामन्यात खेळताना स्मृतीने 42 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत तिने 11 चौकार मारले. तिने या खेळीदरम्यान 33 चेंडूत चौकारासह तिचे अर्धशतक पूर्ण केले होते. तिची हीच खेळी ऐतिहासिक ठरली.

Smriti Mandhana
Smriti Mandhana ने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर इव्होक; किंमत, फिचर्स पाहून व्हाल थक्क

तिने या खेळी दरम्यान महिलांच्या द हंड्रेड स्पर्धेत 500 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे ती हा विक्रम करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी महिलांच्या द हंड्रेड स्पर्धेत कोणालाही 500 धावा करता आलेल्या नाही.

स्मृतीच्या नावावर आता 100 चेंडूंच्या या स्पर्धेत 17 सामन्यांमध्ये 503 धावांची नोंद झाली आहे. या विक्रमाच्या यादीत तिच्या पाठोपाठ इंग्लंडची नतालिया स्कायव्हर आहे. तिने 497 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक अर्धशतके

दरम्यान, महिलांच्या द हंड्रे़ड स्पर्धेत स्मृतीने 50 धावांचा टप्पा पार करण्याची ही पाचवी वेळ होती. त्यामुळे ती पाचवेळा या स्पर्धेत 50 धावांचा टप्पा पार करणारी देखील पहिलीच खेळाडू ठरली आहे.

तिने भारताच्याच जेमिमाह रोड्रिग्स आणि इंग्लंडच्या डॅनिएल वॅट यांना मागे टाकले आहे. रोड्रिग्स आणि वॅट यांनी महिलांच्या द हंड्रेड स्पर्धेत प्रत्येकी 4 वेळा 50 धावांचा टप्पा पार केलेला आहे.

Smriti Mandhana
Smriti Mandhana Video: स्मृती - पलाशच्या नात्यावर शिक्कामोर्तब? लाईव्ह कॉन्सर्टमध्येच म्हणाला 'आय लव्ह यू...'

स्मृतीचे विजयी धाव काढण्यात अपयश

स्मृतीने शानदार खेळी केली असली, तरी तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. ब्रेव्ह संघाला अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. पण हेली मॅथ्युजच्या चेंडूवर स्मृतीला केवळ एकच धाव काढता आली.

त्यामुळे ब्रेव्ह संघाला हा सामना केवळ 4 धावांनी गमवावा लागला. दरम्यान, ब्रेव्ह संघाकडून स्मृतीव्यतिरिक्त डॅनिएल वॅटने 37 चेंडूत 67 धावांची खेळी केली होती. ब्रेव्ह संघाला 166 धावांचा पाठलाग करताना 100 चेंडूत 4 बाद 161 धावा करता आल्या.

तत्पूर्वी फायरकडून मॅथ्युजनेच फलंदाजीतही कमाल केली. तिने 38 चेंडूत 13 चौकारांसह 65 धावांची खेळी केली. त्यामुळे फायर संघाने 100 चेंडूत 3 बाद 165 धावा केल्या होत्या. ही महिलांच्या द हंड्रेड स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्याही ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com