RR च्या सोशल मीडिया टीमने संजू सैमसनची उडवली खिल्ली

दरम्यान संजूने नाराजी व्यक्त केल्यानंतर, या प्रकरणावर कारवाई झाली
RR च्या सोशल मीडिया टीमने संजू सैमसनची उडवली खिल्ली
Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: आयपीएल 2022 सुरू होण्याच्या एक दिवस आधी, राजस्थान रॉयल्स (आरआर) मैदानाबाहेर अडचणीत सापडले आहे. फॅन्चायझीच्या सोशल मीडिया टीमने चाहत्यांना गुंतवून ठेवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून संघाचा कर्णधार संजूचा फोटो शेअर केला होता, पण संजूने आक्षेप घेतल्यानंतर तो काढून टाकण्यात आला. संजूला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. आपली निराशा व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर आपली मन की बात लिहिली. (skipper sanju samson complaint on rajasthan royals social media team)

Tweet
TweetDainik Gomantak

राजस्थान रॉयल्सचा (Rajatan Royal) कर्णधार सॅमसनने ट्विटरवर लिहिले की, "हे सर्व करणे मुलांसाठी ठीक आहे, परंतु संघ व्यावसायिक असणे आवश्यक आहे. आणि यानंतर फ्रेंचायझीने ट्विट काढून टाकले.

सुरुवातीच्या ट्विटमध्ये, रॉयल्सने टीमने बसमधील सॅमसनचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्यावर टोपी आणि सनग्लासेस घातले, "क्या खूब लगते हो" असे कॅप्शन सोबत हसणारे इमोजी दिलेले.

सॅमसनने नाराजी व्यक्त केल्यानंतर, फ्रँचायझीने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी नमूद केले की ते आपल्या डिजिटल धोरणावर पुनर्विचार करेल आणि लवकरच एक नवीन सोशल मीडिया टीम नियुक्त करेल. "आजच्या घटनेनंतर, आम्ही सोशल मीडियासाठी आमचा दृष्टीकोन बदलू. संघ त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्येक चाहत्याला सर्व अपडेट्स पोहचवू. मंगळवारी, राजस्थान रॉयल्सचा संघ हैदराबादविरुद्ध पहिला सामना झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com