सिक्सर किंग युवराज सिंग टी-२०मध्ये करणार पुनरागमन

मुलग्रव क्रिकेट क्लबने युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांना टी-२० सामन्यांसाठी करारबध्द केले आहे. अद्याप कोणताही भारतीय खेळाडू बिग बॅश लीगमध्ये खेळलेला नाही.
मुलग्रव क्रिकेट क्लबने युवराज सिंगला करारबध्द केले
मुलग्रव क्रिकेट क्लबने युवराज सिंगला करारबध्द केले Twitter/@YUVSTRONG12
Published on
Updated on

भारताचा (India) माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) क्रिकेटच्या (Cricket) मैदानात पुनरागमन करणार आहे. या वर्षाखेरीस युवी ऑस्ट्रेलियात (Australia) स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तनुसार मुलग्रव क्रिकेट क्लबने (Mulgrav Cricket Club) युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांना टी-२० सामन्यांसाठी करारबध्द (Contracted) केले आहे. तसेच एबी डिव्हिलियर्स आणि ब्रायन लारा यांच्याशी देखील या क्लबची चर्चा सुरु असल्याचे समोर येत आहे.

ख्रिस गेल सध्या दक्षिण आफ्रिके विरुध्द वेस्टइंडिज कडून खेळत आहे. यापूर्वी या क्लबने दिलशान तिलकरत्ने, उपुल थरंगा आणि सनथला यांना या आधीच करार बध्द केले आहे. आता आम्ही काही संभाव्य खेळाडूंसह अंतिम करार करण्याचे काम करीत आहोत. युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांनाही आम्ही करार बध्द करण्याच्या मार्गावर आहोत.

मुलग्रव क्रिकेट क्लबने युवराज सिंगला करारबध्द केले
WTC Final : पराभवानंतर भारतीय संघाचे निवडकर्ते इंग्लंड - श्रीलंकेत जाणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंगने कॅनडामध्ये ग्लोबल टी-२० स्पर्धेत युवराज खेळला, त्यानंतर टी-१० लीग देखील खेळली, तो बिग बॅश लीगमध्ये खेळणार आसल्याची चर्चा होती. अद्याप कोणताही भारतीय खेळाडू बिग बॅश लीगमध्ये खेळलेला नाही.

२०२१ मध्ये युवराजने रोड सेफ्टी सिरीजमध्ये सचिन तेंडूलकरच्या नेतृत्त्वात जबरदस्त कामगिरी केली होती. त्या सिरीजमध्ये आपल्याला व्हिंटेज युवराज सिंग पहावयास मिळाला होता. जरी तो विदेशी लीग खेळत असला तरी युवराज आयपीएलमध्ये कमबॅक करु शकत नाही. युवराज पंजाब क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. अशा बातम्या समोर येत होत्या, पण युवराजने परदेशी लीग खेळल्याने बीसीसीआयने त्याला परवानगी नाकारली होती.

एबी डिव्हिलियर्स आणि लारा यांचा विचार केल्यास दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. एबी आयपीएलमध्ये खेळत आहे. तर दिग्गज फलंदाज लाराने रोड सेफ्टी मालिकेत वेस्टइंडिजच्या संघाचे नेतृत्त्व केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com