Shubman Gill: 'काम संपलेलं नाही, सचिन-धोनीच्या पंक्तीत...', रँकिंगमध्ये पहिला आल्यानंतर गिलची प्रतिक्रिया

ICC ODI Ranking: वनडे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेला गिल केवळ चौथाच भारतीय फलंदाज आहे, याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

Shubman Gill React on becoming Number One Batsman in ICC ODI Ranking:

भारताच सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताने ८ पैकी ८ सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. याबरोबरच भारताचे वनडे क्रमवारीतही वर्चस्व दिसून आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली होती. या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. त्याचबरोबर फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल, तर गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराजने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत हा अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच वनडे क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. याबद्दल त्याने आयसीसीकडे प्रतिक्रिया दिली आहे.

Shubman Gill
Team India Video: 'लाईट्स ऑफ अन्...' लखनऊच्या स्टेडियमवर झळकला टीम इंडियाचा 'बेस्ट फिल्डर'

शुभमन गिल म्हणाला, 'खूप चांगलं वाटतंय, पण मला वाटतंय की अजून काम संपलेले नाही. अजून आम्हाला काही सामने (वर्ल्डकपमधील) खेळायचे आहेत. आशा आहे की आम्ही वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून अव्वल क्रमांकावर राहू. असे झाले, तर ते खूपच भारी असेल.'

गिल अव्वल क्रमांक मिळवणारा चौथाच भारतीय

गिल हा आयसीसीच्या वनडे क्रमवारी फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर राहिलेला चौथाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी या तिघांनाच फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवता आला आहे. त्यामुळे त्यांच्या पंक्तीत आता गिलचाही समावेश झाला आहे.

Shubman Gill
World Cup 2023: सेमीफायनल अन् अंतिम सामन्याचे तिकीट मिळण्याची चाहत्यांना अखेरची संधी! BCCI ने दिली मोठी अपडेट

याबद्दलही गिल म्हणाला, 'खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय. लहान असताना तुम्ही नेहमीच तुमच्या देशासाठी खेळण्याचे आणि वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न पाहिलेले असते. तसेच देशासाठी चांगली कामगिरी केल्याने नेहमीच छान वाटतं. तुम्ही हे शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण माझं नाव महान लोकांबरोबर आलं आहे, ज्याबद्दल खूप आनंद आहे.'

गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 92 धावांची खेळीही केली होती. आत्तापर्यंत त्याने 6 डावात 219 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com