IND vs BAN: सारा जमाना गिलच्या बॅटिंचा दिवाना, वनडे वर्ल्ड कपमध्ये केला मोठा चमत्कार!

Shubman Gill IND vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे.
Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill IND vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेशने भारताला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या सामन्यात शुभमन गिलने मोठा चमत्कार केला आहे.

विश्वचषकातील पहिले अर्धशतक

दरम्यान, शुभमन गिल 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. तो आजारी होता, पण त्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले आणि 16 धावा केल्या.

आता बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात तो पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. सामन्यात 55 धावा करुन तो मेहदी हसनच्या चेंडूवर बाद झाला.

हा त्याचा पहिला एकदिवसीय विश्वचषक आहे आणि त्याने एकदिवसीय विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले आहे.

Shubman Gill
IND vs BAN: चालू सामन्यात टीम इंडियाला जबर धक्का! हार्दिक मैदानातून बाहेर, BCCI ची मोठी अपडेट

शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे

शुभमन गिलने 2023 मध्ये 22 सामन्यांमध्ये 1299 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 5 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. अल्पावधीतच त्याने आपली छाप सोडली आहे.

Shubman Gill
IND vs BAN: हार्दिक बाहेर गेला अन् विराट तब्बल 6 वर्षांनी बॉलिंगला उतरला, पाहा Video

भारताला 257 धावांचे लक्ष्य मिळाले

बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 256 धावा केल्या. बांगलादेशकडून तनजीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची सलामी दिली. तनजीदने 51 आणि लिटनने 66 धावांचे योगदान दिले.

हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही आणि ते बाद होत राहिले. अखेरीस महमुदुल्लाहने 46 धावा केल्या. त्याच्यामुळेच संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. भारताकडून (India) जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी 2-2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com