एफसी गोवाच्या ओर्तिझला फुटबॉल महासंघांची कारणे दाखवा नोटीस !

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) शिस्तपालन समितीने एफसी गोवाचा आघाडीपटू होर्गे ओर्तिझ (Jorge Ortiz) याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Jorge Ortiz

Jorge Ortiz

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील सामन्याच्या वेळेस मैदानावर ‘हिंसक आचरण’ केल्याचा आरोप ठेवून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) शिस्तपालन समितीने एफसी गोवाचा आघाडीपटू होर्गे ओर्तिझ (Jorge Ortiz) याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘चेंडू खेळात नसताना प्रतिस्पर्ध्यास धक्का दिल्या’बद्दल ‘हिंसक आचरण’ केल्याचा ठपका ओर्तिझवर आहे. ही घटना 11 डिसेंबर रोजी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर घडली. त्यावेळी ओर्तिझ याने बंगळूर एफसीच्या सुरेश वांगजाम याला धक्का दिला होता. त्याबद्दल महासंघाच्या शिस्तपालन समितीने 48.1.2 कलमांतर्गत ओर्तिझ याने गुन्हा केल्याचा अहवाल असल्याने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ओर्तिझला या नोटीशीला बुधवारपर्यंत उत्तर द्यायचे आहे.

ओर्तिझप्रमाणेच महासंघाच्या शिस्तपालन समितीने एटीके मोहन बागानचे फिजिओथेरपिस्ट लुईस आफोन्सो रेदोन्दो मार्टिनेझ यांनाही ‘हिंसक आचरण’ कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लुईस यांना एटीके मोहन बागान व चेन्नईयीन एफसी यांच्यात 11 डिसेंबर रोजी फातोर्डा येथे झालेल्या लढतीच्या वेळेस रेफरीने रेड कार्ड दाखविले होते. लुईस यांनाही बुधवारपर्यंत उत्तर द्यावे लागले.

<div class="paragraphs"><p>Jorge Ortiz</p></div>
Indian Super League: केरळा ब्लास्टर्सने ईस्ट बंगालशी साधली बरोबरी

बांबोळीत काय घडले?

11 डिसेंबर रोजी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर सामन्याच्या 55 व्या मिनिटास एफसी गोवाचा एक खेळाडू रेड कार्डमुळे कमी झाला. यावेळी बंगळूरच्या सुरेश वांगजामने स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ धोकादायक टॅकल केल्यानंतर, दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले. रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी आपल्या साहाय्यकांशी चर्चा करून ओर्तिझला रेड कार्ड, तर सुरेशला यलो कार्ड दाखविले होते. नंतर 84 व्या मिनिटास एदू बेदियास टॅकल केल्यामुळे सुरेशला आणखी एक यलो कार्ड मिळाले व तो रेड कार्डसह मैदानाबाहेर केला. त्यामुळे बंगळूरचाही एक खेळाडू कमी झाला व दोन्ही संघ प्रत्येकी 10 खेळाडूंसह खेळले.

एका सामन्यास मुकणार

बंगळूरविरुद्ध रेड कार्ड मिळाल्यामुळे ओर्तिझवर नियमानुसार एका सामन्याचे निलंबन आहे. त्यामुळे तो शनिवारी होणाऱ्या एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यास मुकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com