Umran Malik ला पाहून शोएब अख्तरचा जळफळाट; म्हणाला, 'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात...'

उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीबद्दल शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे.
Shoaib Akhtar statement on Umran Malik
Shoaib Akhtar statement on Umran MalikDainik Gomantak
Published on
Updated on

Umran Malik: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाज उमरान मलिकने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात ताशी 155 किमी वेगाचा चेंडूही टाकलेला. पण आता यावर शोएब अख्तरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

उमरानने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 17 व्या षटकामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाविरुद्ध ताशी 155 किमी वेगाचा चेंडू टाकलेला. या चेंडूवर शनकाने विकेटही गमावली होती. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाजांने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडूही ठरला होता.

यापूर्वीही उमरान सातत्याने ताशी 145-150 किमीच्या वेगाने चेंडू टाकत असल्याचे दिसले होते. त्याने आयपीएलमध्ये देखील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ताशी 157 किमी वेगाने चेंडू टाकलेला होता. त्याचे हे सातत्य पाहून अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे की तो लवकरच शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडेल.

अख्तरने 2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध ताशी 161.3 किमी वेगाने चेंडू टाकला होता. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू आहे.

दरम्यान उमरान त्याचा हा विक्रम तोडण्याबद्दल अख्तरला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी स्पोर्ट्सकिडाशी बोलताना अख्तर म्हणाला, 'माझा विक्रम त्याने मोडला, तर मला आनंद वाटेल.' पण याबरोबरच त्याने असेही सांगितले की 'माझा विक्रम तोडता-तोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत. मला म्हणायचंय की तो फिट रहावा.'

Shoaib Akhtar statement on Umran Malik
Umran Malik: भारताची तोफ! जम्मू एक्सप्रेसच्या वेगवान चेंडूने रचला इतिहास, पाहा Video

उमराननेही दिलेली प्रतिक्रिया

यापूर्वी उमरानलाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला, त्यावेळी उमरानने सांगितले होते की हा विक्रम जर त्याने तोडला, तर तो भाग्यशाली असेल.

उमरानने आत्तापर्यंत खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही 4 षटकांत 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com