भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप मॅचवर 'रावळपिंडी एक्सप्रेस' ने केली भविष्यवाणी

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषक सामन्याआधीच भविष्यवाणी केली आहे.
Rohit Sharma & Babar Azam
Rohit Sharma & Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

T-20 World Cup: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषक सामन्याआधीच भविष्यवाणी केली आहे. शोएब म्हणाला की, 'यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताला पराभूत करणे पाकिस्तानला कठीण जाईल.' भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेनंतर शोएब अख्तरचे वक्तव्य आले आहे. या मालिकेत टीम इंडियाने आक्रमक खेळी करत मालिका 2-1 अशी जिंकली.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटनुसार, शोएब अख्तर म्हणाला, 'भारत यावेळी योग्य नियोजनासह येईल. यावेळी टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) भारतावर (India) मात करणे पाकिस्तानसाठी (Pakistan) सोपे नसेल. परंतु आता सामन्याच्या निकालाचा अंदाज बांधणे खूप कठीण आहे. परंतु मेलबर्नची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देत असल्याने पाकिस्तानने नंतर गोलंदाजी करावी.'

Rohit Sharma & Babar Azam
हार्दिक पंड्या T-20 World Cup साठी सज्ज

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियम हे भारताच्या नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत दुसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे. 23 ऑक्टोबरला या स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी विक्रमी प्रेक्षक येतील, असा विश्वास अख्तरने व्यक्त केला आहे.

शोएब पुढे म्हणाला, 'मला खात्री आहे की, यावेळी सर्वाधिक प्रेक्षक येतील. मेलबर्नमध्ये जवळपास 150,000 प्रेक्षक एकावेळी मॅच पाहू शकतात. त्यापैकी 70,000 भारतीय प्रेक्षक असतील.'

Rohit Sharma & Babar Azam
क्रिकेटपटू दीपक चहर T-20 World Cup ला मुकणार?

तसेच, गेल्या टी-20 विश्वचषकात या दोन संघांची शेवटची गाठ पडली होती, तेव्हा पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. यंदा हे दोन्ही देश एकदा नव्हे तर दोनदा भेटणार आहेत. वास्तविक, आशिया चषक टी-20 विश्वचषकापूर्वी ऑगस्टमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये हे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com