Video: राजस्थान रॉयल्सचा मॅच फिनिशर परतला मायदेशी, जाणून घ्या कारण

अखेर असे काय झाले की हेटमायरला अचानक घरी परतावे लागले.
Shimron Hetmyer
Shimron HetmyerTwitter
Published on
Updated on

राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) आयपीएल 2022 च्या मध्यात त्याचा संघ सोडला आहे. त्याने एक दिवस अगोदर राजस्थानला (RR) पंजाब किंग्जविरुद्ध जोरदार विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेस्ट इंडिजला जाणारे विमान पकडले. पंजाबविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हेटमायरने 193 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. हेटमायरने या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. म्हणजेच 24 धावा फक्त चौकारावरून काढल्या. अखेर असे काय झाले की हेटमायरला अचानक घरी परतावे लागले. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कॅरेबियन फलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घरी परतण्याचे कारण समोर आले आहे. (Shimron Hetmyer Video)

Shimron Hetmyer
चेतेश्वर पुजाराची दमदार कामगिरी, भारतीय संघामध्ये होणार पुनरागमन?

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटमध्ये सांगितले की शिमरॉन हेटमायर आज सकाळी त्याच्या घरी गयानाला रवाना झाला आहे. त्याच्या घरी एका गोंडस पाहूण्याचे आगमन होणार आहे पण, तो लवकरच संघात सामील होणार आहे. व्हिडिओमध्ये, हेटमायरने सांगितले की, मूल एकदाच जन्माला येते आणि मी पहिल्यांदाच वडील होणार आहे. म्हणूनच मी घरी परतत आहे. माझे सर्व सामान येथे आहे. मला मिस करू नका, मी लवकरच परत येईन. व्हिडिओमध्ये, सहकारी खेळाडू युझवेंद्र चहल, जेम्स नीशम, रसी व्हॅन डर डुसेन त्याला निरोप देताना दिसले.

Shimron Hetmyer
धावपटू अविनाश साबळेने 30 वर्ष जुना विक्रम मोडत देशाचे नाव उंचावले

मॅच फिनिशरची भूमिका पार पाडतो हेटमायर

हेटमायर भारतात कधी परतणार याची माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे . फ्रँचायझीने सांगितले की बाळ जन्माला आल्यानंतर हेटमायर मुंबईला परतेल आणि संघात सामील होईल. हेटमायरने या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 72.75 च्या सरासरीने 291 धावा केल्या आहेत. त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र 7 सामन्यांत तो नाबाद राहिला आहे. यावरून या मोसमात राजस्थानच्या यशात या कॅरेबियन खेळाडूचा किती मोठा हात आहे याची कल्पना येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com