Shikhar Dhawan: 'गब्बर'चे टीम इंडियात थेट कॅप्टन म्हणून होणार कमबॅक, पण वर्ल्डकप मुकणार?

शिखर धवन भारतीय संघाकडून अखेरचा डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanDainik Gomantak
Published on
Updated on

Shikhar Dhawan may lead Indian cricket team at 19th Asian Games: भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही त्याला संधी मिळालेली नाही, पण त्याचे लवकरच भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

37 वर्षीय डावखुरा फलंदाज असलेल्या शिखर धवनने आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व केले होते. तो भारताकडून अखेरचा सामना मागच्या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

सध्या समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार शिखर धवनला आगामी एशियन गेम्स 2022 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रभारी प्रशिक्षकपद दिले जाऊ शकते.

Shikhar Dhawan
आईइतकाच बापाचाही हक्क! Shikhar Dhawan च्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश

एशियन गेम्स 23 सप्टेंबर 2023 पासून होणार असून 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा चीनमधील हांग्जोमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी 7 जुलैला बीसीसीआयच्या बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ पाठवण्याच तयार आहे.

पण, समस्या अशी आहे की वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यामुळे एशियन गेम्स आणि वर्ल्डकप स्पर्धांच्या तारखा एकत्र आल्या आहेत.

अशात बीसीसीआय एशियन गेम्ससाठी भारताचा अ संघ पाठवण्याची शक्यता आता. त्यामुळे जर ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांसारख्या खेळाडूंना जर वर्ल्डकपसाठी संधी मिळाली नाही, तर ते एशियन गेम्समध्ये खेळताना दिसू शकतात. तसेच महिलांचा मात्र प्रमुख संघच या स्पर्धेत खेळताना दिसून शकतो.

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan: गब्बरनं कोहलीला पछाडलं! ताबडतोड फिफ्टी ठोकत 'या' विक्रमाला घातली गवसणी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जर शिखरला एशियन गेम्ससाठी भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले, तर मात्र तो वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये भारताला पहिला सामना 8 ऑक्टोबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

तसेच एशियन गेम्सचा अखेरचा दिवसही 8 ऑक्टोबर 2023 आहे. त्यामुळे वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात निवडलेले खेळाडू एशियन गेम्समध्ये दिसण्याची शक्यता कमी असणार आहे.

एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेट

खरंतर 19 व्या एशियन गेम्सचे आयोजन गेल्यावर्षी सप्टेंबरदरम्यान होणार होते. पण चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली. एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटचे आयोजन होणार आहे.

यापूर्वी 2010 आणि 2014 साली एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचे आयोजन झाले होते. 2010 मध्ये बांगलादेशच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2014 मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com