कसोटी क्रिकेटमध्ये सध्याचा भारतीय संघ (Indian Team) मजबूत असल्याचे मानले जाते. संघात विराट कोहलीसारखा (Virat Kohli) उत्कृष्ठ फलंदाज आहे, ज्याची गणना या काळातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्याशिवाय टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य राहणे हे कसोटी फलंदाज गोलंदाजांसाठीही त्रासदायक ठरत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पीनर शेन वॉर्न (Shane Warne) भारतीय संघातील खेळाडूंच्या क्रमवारीचे कौतुक करत म्हटले की, ते प्रभावी आहेत परंतु त्यांच्या फलंदाजीची क्रमवारी जुन्या भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीच्या जवळही नाही.
वॉर्नने (Shane Warne) टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमबद्दल यावेळी बोलत होता. ज्यात त्याने पुढे म्हटले की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होते. या पाच फलंदाजांनी जगभरातील महान गोलंदाजांना आपल्या दबावाखाली ठेवले. या सर्व महान भारतीय खेळाडूंच्या विरोधात वॉर्न आपल्या कारकिर्दीतील बरेच क्रिकेट सामने खेळला आहे.
दरम्यान, वॉर्न भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीने चांगलाच प्रभावित झाला आहे. त्याने विराटला क्रिकेटमधील महान क्रिकेटपटूंच्या मांदीयाळीत बसवले. परंतु भारताची एकूण फलंदाजीचा क्रम पाहिला तर वॉर्नच्या दृष्टीने सध्याच्या ऑर्डरची जुन्या 'फॅब फाइव्ह'शी तुलनाच करता येणार नाही. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना वॉर्न म्हणाला, "त्यांची फलंदाजी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सेहवाग आणि तेंडुलकरसारखी मजबूत नाही. विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, परंतु जेव्हा तुम्ही पहिल्या पाचमध्ये पाहता तेव्हा सेहवाग, गांगुली, द्रविड, लक्ष्मण आणि तेंडुलकर यांची फलंदाजी विलक्षण होती. मला वाटत नाही की, तुम्ही सध्याच्या फलंदाजी क्रमाला सर्वोत्तम भारतीय फलंदाजी क्रम म्हणू शकता."
वेगवान गोलंदाजांनी यश मिळवून दिले
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी उत्तम होती. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सलग कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडमध्ये ती 2-1 ने पुढे होते. कोहली, रोहित आणि पंत हे संघाचे स्टार फलंदाज आहेत परंतु भारतीय संघाला अलीकडील यश त्यांच्या गोलंदाजांनी मिळवून दिले आहे. माजी ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर पुढे म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन उत्कृष्ट खेळाडू आहेत, तर येत्या काळात पंत सुपरस्टार असेल, परंतु मला वाटते की, भारतीय गोलंदाजांनी टीम इंडियाच्या सर्व कठीण परिस्थितींमध्येही जिंकण्यास मदत केली आहे.
इंग्लंड दौरा संपला
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत होता. चार सामन्यांनंतर टीम इंडिया मालिकेत 2-1 पुढे होती. मालिकेतील निर्णायक कसोटी सामना शुक्रवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरु होणार होता, परंतु कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला. टीम इंडियामधील खेळाडूंसह काही सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे इतर खेळाडूंनी मैदानावर उतरण्यास नकार दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.