तालिबानसाठी बॅटिंग करताना आफ्रिदी क्लीन बोल्ड

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi), जो अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो
Shahid Afridi trolls on his Taliban statement
Shahid Afridi trolls on his Taliban statementDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi), जो अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो,अनेकदा त्याचे वक्तव्य बेताल होतात आणि त्याच्यावर सडकून टीका देखील होते.आणि अशात पुन्हा एकदा आफ्रिदी आपल्या वक्तव्यांमुळे टीकेचा धनी होत आहे. यावेळी त्याने तालिबानची (Taliban) जोरदार स्तुती केली आहे . त्याने तालिबानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.तो म्हणाला की 'तालिबान चांगली कल्पना घेऊन आला आहे.' काही काळापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता, ज्यामुळे तेथील लोकांना देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले.(Shahid Afridi trolls on his Taliban statement)

आफ्रिदी म्हणाला की तालिबान सकारात्मक मानसिकतेने आला आहे. ते महिलांना काम करू देत आहेत आणि माझा विश्वास आहे की तालिबानला क्रिकेट आवडते. आफ्रिदीच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.

काही चाहत्यांनी त्याला लक्ष करत तो महिला हक्क कार्यकर्ता आणि महिला सक्षमीकरणाचा वकिल आहे. तर काही लोकांनी सांगितले की तो आता खोटे बोलून कंटाळला आहे.

Shahid Afridi trolls on his Taliban statement
IND vs ENG: जेम्स अँडरसन कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती?

आफ्रिदी म्हणाला की, तालिबान महिलांना नोकऱ्या देत आहे. क्रिकेटला समर्थन देणे आणि पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेलाही समर्थन देत आहे .श्रीलंकेत कोरोनाचं संकट आल्यामुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील मालिका रखडल्याचा उल्लेखही त्याने यावेळी केला. या व्यतिरिक्त, आफ्रिदीने असेही म्हटले की पुढील पाकिस्तान सुपर किंग्ज कदाचित त्याचे शेवटचे असेल आणि त्याला क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळायला आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com