सेझा अकादमी उपांत्यपूर्व फेरीत; गोवा पोलिस कप स्पर्धेत वेळसाव क्लबला नमविले

सेझा फुटबॉल अकादमीने (Seza Academy) 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल (Goa Police Cup Football) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 Football Cup
Football Cup Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रंगतदार लढतीत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबला 4-2 फरकाने नमवून सेझा फुटबॉल अकादमीने (Seza Academy) 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल (Goa Police Cup Football) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

 Football Cup
एफसी गोवाने वास्कोला बरोबरीत रोखले

सामन्याचा पूर्वार्ध अटीतटीचा ठरला. या कालावधीत सेझा अकादमी संघ ३-२ फरकाने आघाडीवर होता. ॲश्ली कार्दोझ याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे ९ व ३०व्या मिनिटास गोल नोंदवून सेझा अकादमीस 2-0 आघाडी मिळवून दिली. नंतर जेम्स फर्नांडिसने दोन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे वेळसाव क्लबने 2-2 अशी गोलबरोबरी साधली. जेम्सने अनुक्रमे 36 व 38 व्या मिनिटास गोल नोंदविला. विश्रांतीपूर्व आकाश कुडणेकर याने सेझा अकादमीस पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 55 व्या मिनिटास फहीझ महंमद याने गोल केल्यामुळे सेझा अकादमीची आघाडी 4-2 अशी भक्कम झाली. स्पर्धेत सोमवारी सेंट अँथनी स्पोर्टस क्लब व पणजी फुटबॉलर्स यांच्यात लढत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com