पेडणे प्रीमियर लीग क्रिकेट (Pedne Premier League Cricket) स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 16 संघांनी भाग घेतला.
पेडणे प्रीमियर लीग क्रिकेट (Pedne Premier League Cricket) स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 16 संघांनी भाग घेतला.Dainik Gomantak

पेडणे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंची निवड

खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम पेडणे (Pedne) येथील दीनदयाळ सभागृहात झाला. यावेळी जर्सी आणि करंडकाचे अनावरण झाले. स्पर्धा लवकरच तुये येथील सुरेश रैना मैदानावर (Suresh Raina ground) खेळली जाईल.
Published on

पेडणे: पेडणे प्रीमियर लीग क्रिकेट (Pedne Premier League Cricket) स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 16 संघांनी भाग घेतला.

खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम पेडणे येथील दीनदयाळ सभागृहात झाला. यावेळी जर्सी आणि करंडकाचे अनावरण झाले. स्पर्धा लवकरच तुये येथील सुरेश रैना मैदानावर (Suresh Raina ground) खेळली जाईल, अशी माहिती स्पर्धा आयोजक ध्रुव स्पोर्टस क्लबचे प्रमुख माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी दिली. ही स्पर्धा 2016 पासून खेळली जाते, पहिल्याच वर्षी स्पर्धेत केवळ आठ संघ होते. यंदा पेडणे तालुक्यातील 16 संघांनी प्रवेश निश्चित केल्याचे कळंगुटकर यांनी नमूद केले.

 पेडणे प्रीमियर लीग क्रिकेट (Pedne Premier League Cricket) स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 16 संघांनी भाग घेतला.
‘सायकलिंग’ला गोवा खंडपीठाचा दणका! जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ऑनलाईन पद्धतीने 319 खेळाडूंची लिलावासाठी नोंदणी झाली, त्यापैकी 83 खेळाडूंचा लिलाव झाला. गुरुप्रसाद आरोसकर, गौरेश सावळ देसाई, सूरज गावडे यांना प्रत्येकी 3400 रुपयांची बोली मिळाली . मनीष राव (15 वर्षे) हा सर्वांत लहान, तर धोंडू तुळसकर (48 वर्षे ) सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. अनिकेत केरकर यांनी स्वागत केले, राम नागवेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संजय नागवेकर आणि आनिकेत केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचा लिलाव झाला . यावेळी दीपक कलांगुटकर, नरहरी पेडणेकर, अरुण पार्सेकर, शेखर पार्सेकर, आयोजन सचिव नीलेश कळंगुटकर, सुदन ठाकूर, मुन्ना दाभोलकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com