'सेहवाग'च्या 'या' वक्तव्यामुळे 'मुंबई इंडियन्स'चे फॅन्स नाराज

अगोदरच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड, त्यात भर म्हणून सेहवागचे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधी विधान
Virendra Sehwag
Virendra SehwagDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या सुरु असलेले आयपीएल 2021 (IPL 2021) हे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघासाठी खूपच निराशाजनक ठरत आहे. मागच्या हंगामातील चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स टीमला यावेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील धडपडत करावी लागत आहे. मुंबई इंडियन्स सध्या 11 सामन्यांत पाच विजय आणि 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे चाहते (MI Fans) संघाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. मात्र, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला (Virendra Sehwag) मुंबई पुन्हा चॅम्पियन बनताना पाहण्याची इच्छा नाही.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास मुंबई इंडियन्स संघासाठी सोपा राहिलेला नाही. यूएईमध्ये आल्यानंतर त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संघाने पंजाब किंग्जवर विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबई इंडियन्सला तीन सामन्यांच्या रूपात तीन संधी आहेत. जर मुंबईने तिन्ही सामने जिंकले तर प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या सर्व संधी असतील. वीरेंद्र सेहवागला मात्र असे झालेले नको आहे. आयपीएल 2021 मध्ये नवीन चॅम्पियन पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली पाहिजे असे सेहवागने मत आहे.

Virendra Sehwag
टी -20 विश्वचषकासाठी Universal Bossची IPL मधून माघार

वीरेंद्र सेहवागला नवीन चॅम्पियन पाहायचे आहे

एका मुलाखतीत बोलताना सेहवाग म्हणाला, "मुंबई इंडियन्सने या वर्षी अव्वल स्थान गाठावे असे मला वाटत नाही, एक नवीन संघ पात्र ठरला पाहिजे आणि आम्हाला एक नवीन चॅम्पियन मिळाला पाहिजे." तो बंगलोर, दिल्ली किंवा पंजाब असू शकतो. प्लेऑफचा रस्ता सध्या मुंबई इंडियन्ससाठी सोपा नाही. याविषयी सेहवाग म्हणाला, 'मुंबई आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहे आणि त्याला पलटवार कसा करायचा हे देखील माहित आहे, परंतु मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, तरच ते तेथे जाण्यास सक्षम होईल. प्लेऑफमध्ये, तथापि, मुंबईसाठी आगामी सर्व सामने इतके सोपे होणार नाहीत.

Virendra Sehwag
IPL 2021: पंजाबच्या कोलकत्यावरील विजयाने दिल्लीची 'बल्ले बल्ले'

इतिहास मुंबई इंडियन्सकडे आहे

तो पुढे म्हणाले, 'कधीकधी तुम्ही चुका करता जेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी हताश असाल आणि त्या चुका तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात, पण मुंबईचा इतिहास पाहता, ते असे आहेत की जेव्हा ते अशा स्थितीत सापडतात तेव्हा या परिस्थितीतून जिंकुन मग ते प्लेऑफसाठी पात्र होण्यात पटाईत आहेत. म्हणून, जर आपण इतिहासात पाहिले तर मुंबई इंडियन्स त्याची पुनरावृत्ती करू शकते, परंतु माझा इतिहासावर जास्त विश्वास नाही, असे सेहवाग शेवटी म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com