China Masters Super 750: रोमांचक फायनलमध्ये सात्विक-चिरागची झुंज अपयशी! उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: चायना मास्टर्स स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू चिराग आणि सात्विकसाईराज यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Satwiksairaj Rankireddy and Chirag ShettyBAI_Media
Published on
Updated on

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Runner-Up at China Masters Super 750 badminton tournament:

भारताची बॅडमिंटनमधील स्टार जोडी सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी शेनझेन येथे झालेल्या चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अंतिम सामना खेळला.

मात्र, अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांना जागतिक क्रमावारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वँग चँग या जोडीकडून पराभव स्विकारावा लागला. चीनच्या जोडीने सात्विक आणि चिराग यांचा तीन 19-21, 21-18, 19-21 अशा तीन गेममध्ये पराभव केला.

सात्विक आणि चिराग यांनी चीनच्या जोडीला शेवटपर्यंत चिवट झुंज दिली होती, पण अखेरीस त्यांना विजय मिळवण्याच अपयश आले. पहिल्या गेममध्ये लियांग-वँग जोडीने सुरुवातीलाच आघाडी मिळवली होती. ते 3-8 अशा आघाडीवर होते.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Asian Championships 2023: सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीने रचला इतिहास, 58 वर्षांनंतर भारताला मिळवून दिलं 'सुवर्ण'

मात्र, नंतर सात्विक आणि चिरागनेही लय मिळवली आणि सलग चार पाँइंट्स मिळवले. त्यामुळे 9-9 अशी बरोबरीही झाली होती. त्यानंतरही चीनच्या जोडीचा खेळ उंचावर होता, पण चिराग आणि सात्विकही हार मानत नव्हते. 19-19 अशी बरोबरी झाल्यानंतर मात्र चीनच्या जोडीने सलग दोन पाँइंट्स जिंकले आणि पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही चीनच्या जोडीने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 1-4 अशी आघाडी मिळवली होती. मात्र भारतीय जोडीने चांगला संघर्ष करत 10-10 अशी बरोबरी केली आणि त्यानंतर आघाडी मिळवत ती शेवटपर्यंत टिकवली.

त्यामुळे दुसरा गेम सात्विक आणि चिराग यांनी 21-18 असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. त्याचमुळे हा सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये गेला.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
World Cup 2023: प्रेक्षकांनी रचला इतिहास! तब्बल 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली फायनल, जय शाह यांची माहिती

तिसऱ्या गेममध्ये लियांग-वँग जोडीने सुरुवातीलाच सलग 5 पाँइंट्स मिळवले. एका वेळी ते 1-8 अशा आघाडीवरही होते. पण सात्विक आणि चिराग यांनी त्यांना चूका करायला लावल्या. त्यांनी सलग तीन पाँइंट्स मिळवत चीनची आघाडी 8-11 अशी कमी केली.

यानंतरही चीनच्या जोडीने आक्रमक खेळ केला. त्यांनी सलग 4 पाँइंट्स मिळवले. त्यामुळे एका क्षणी भारतीय जोडी 10-19 अशा पिछाडीवर होती. मात्र, सात्विक आणि चिराग यांनी कडवी झुंज दिली आणि आघाडी 19-20 अशी कमी केली होती. पण अखेरीस चीनची जोडीचा खेळ भारी पडला आणि हा गेम लियांग-वँग यांनी 19-21 असा जिंकत सामनाही जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com