Ranji Trophy 2022: सर्फराजने रचला इतिहास, असे करणारा ठरला दुसरा फलंदाज

मुंबईचा विस्फोटक फलंदाज सर्फराज खानने (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीमध्ये आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे.
Sarfaraz Khan
Sarfaraz KhanDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईचा विस्फोटक फलंदाज सर्फराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. सर्फराजने रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड (मुंबई विरुद्ध उत्तराखंड, 2 रा क्वार्टर-फायनल) विरुद्ध शतक झळकावले आहे. सर्फराजने 140 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तो या मोसमात रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (Sarfaraz Khan Scores 153 During Mumbai Vs Uttarakhand Ranji Trophy 202122 Quarterfinal)

दरम्यान, सर्फराजने आता या मोसमात रणजीमध्ये 600 हून अधिक धावा केल्या आहेत. सर्फराजचे हे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सातवे शतक आहे. 153 धावांची खेळी खेळून तो बाद झाला. आपल्या शतकादरम्यान त्याने 205 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने गेल्या पाच डावात 156 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत.

Sarfaraz Khan
Ranji Trophy 2022: 'या' 22 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास

फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला

यासह, सर्फराज फर्स्ट क्लास क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात पहिल्या सात शतकांमध्ये 150 पेक्षा जास्त सर्व धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सर्फराज खानने गेल्या 13 डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक तिहेरी शतक, 3 द्विशतके, 150 हून अधिक धावा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या 13 रणजी डावांमध्ये त्याने सहा वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सर्फराजने रणजी ट्रॉफी 2022 मध्ये आतापर्यंत 275, 63, 48, 165 आणि 153 धावा केल्या आहेत.

अशी कामगिरी करणारा डॉन ब्रॅडमननंतरचा दुसरा फलंदाज ठरला

सर्फराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या धावा 80+ च्या सरासरीने केल्या आहेत, जे डॉन ब्रॅडमन नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 95.14 च्या सरासरीने 2000 धावा पूर्ण केल्या. त्याच वेळी, विजय मर्चंटने 71.64, जॉर्ज हेडलीने 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाहने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 69.02 च्या सरासरीने 2000 धावा पूर्ण केल्या.

Sarfaraz Khan
Ranji Trophy 2022: गोव्याची सलामी ओडिशाशी

Highest averages in first-class cricket (min 2000 runs)

Don Bradman - 95.14

Vijay Merchant - 71.64

George Headley - 69.86

Bahir Shah - 69.02

शिवाय, रणजी ट्रॉफीतील (Ranji Trophy) शानदार कामगिरी पाहून चाहत्यांनी सर्फराजचा भारताच्या कसोटी संघात समावेश करावा, असे आवाहन निवडकर्त्यांकडे सुरु केले आहे. सोशल मीडियावर लोक सर्फराजचे खूप कौतुक करत आहेत. सर्फराज आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता. मात्र त्याला फारशी संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटला नक्कीच चकित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com