Goa Senior Womens T-20 Team: गोव्याच्या कर्णधारपदी संजुला नाईक; सीनियर महिला संघ जाहीर

19 ऑक्टोबरपासून स्पर्धेतील मोहीम सुरू
Goa Senior Womens T-20 Trophy Team
Goa Senior Womens T-20 Trophy TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Senior Womens T-20 Trophy Team: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट कर्णधारपदी नव्या चेहऱ्यास संधी देण्यात आली आहे. येत्या १९ ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी संजुला नाईक हिच्याकडे नेतृत्व देण्यात आले असून पूर्वजा वेर्लेकर उपकर्णधार आहे.

स्पर्धा नागपूर येथे १९ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. गोव्याचा ड गटात समावेश असून हिमाचल प्रदेश, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, मणिपूर या संघांविरुद्ध सामने होतील.

Goa Senior Womens T-20 Trophy Team
37th National Games: सरकार यापुढे क्रीडा पर्यटनावर भर देणार : मुख्यमंत्री सावंत

गोव्याच्या संघात भारताची आंतरराष्ट्रीय अष्टपैलू शिखा पांडे, अनुभवी खेळाडू सुनंत्रा येत्रेकर, पाहुण्या खेळाडू बडोद्याच्या तरन्नुम पठाण, मध्य प्रदेशची प्रियांका कौशल यांचाही समावेश आहे.

गतमहिन्यात छत्तीसगडमध्ये झालेल्या निमंत्रित संघांच्या टी-२० स्पर्धेच्या साखळी फेरीत पाच विजय नोंदवून गोव्याने अंतिम फेरी गाठली होती.

मात्र नंतर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. एकंदरीत छत्तीसगडमधील कामगिरी पाहता, गोव्याचा सीनियर महिला संघ टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

गोव्याचा संघ : संजुला नाईक (कर्णधार), पूर्वजा वेर्लेकर (उपकर्णधार), शिखा पांडे, तरन्नुम पठाण, प्रियांका कौशल, सुनंदा येत्रेकर, पूर्वा भाईडकर, तनया नाईक, विनवी गुरव, दीक्षा गावडे, श्रेया परब, निकिता मळीक, तेजस्विनी दुर्गड, दिव्या नाईक, दीक्षा आमोणकर.

Goa Senior Womens T-20 Trophy Team
Mapusa: अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com