गोव्याच्या संध्याला जागतिक बॅडमिंटनमध्ये 'ब्राँझ'

स्पेनमधील (Spain) हुएल्वा येथे झालेल्या स्पर्धेत संध्याने महिलांच्या 35 वर्षांवरील वयोगटातील दुहेरीत संगीता मारी हिच्या साथीत खेळताना पदक मिळविले.
Sandhya Melashimi
Sandhya MelashimiDainik Gomantak

पणजी: गोव्याची (Goa) महिला बॅडमिंटनपटू संध्या मेलाशीमी (Sandhya Melashimi) हिने जागतिक मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (World Masters Badminton Championships) देशासाठी ब्राँझपदकाची कमाई केली. स्पेनमधील (Spain) हुएल्वा येथे झालेल्या स्पर्धेत संध्याने महिलांच्या 35 वर्षांवरील वयोगटातील दुहेरीत संगीता मारी हिच्या साथीत खेळताना पदक मिळविले. या स्पर्धेत भारतीय जोडीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या व संगीता जोडीने उपांत्यपूर्व लढतीत सबिन फ्रोएलिच-ख्रिस्तिन क्लित्श जोडीवर 21-11, 21-4 अशी फरकाने मात केली. मात्र उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या ग्राय उहरेनहोल्ट हर्मन्सेन-हेल केम्पेगार्ड जोडीकडून 21-14, 22-20 फरकाने हार पत्करल्यामुळे संध्या व संगीता यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

संध्याने या स्पर्धेत महिलांच्या 35 वर्षांवरील वयोगटातील एकेरीतही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या स्पर्धेत पुरुषांच्या 65 वर्षांवरील वयोगटात गोव्याच्या तानाजी सावंत व प्रदीप धोंड या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली होती. रशियन जोडीकडून त्यांना 21-14, 28-26 असा पराभव पत्करावा लागला.

Sandhya Melashimi
एफसी गोवासमोर योग्य मानसिकता राखण्याचे आव्हान

राज्य संघटनेकडून अभिनंदन

जागतिक मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेल्या संध्याचे गोवा बॅडमिंटन संघटनेने अभिनंदन केले आहे. संध्या गोव्याची माजी राज्य विजेती खेळाडू आहे, सध्या ती मास्टर्स गटात खेळते. ‘‘अतिशय मेहनती खेळाडूची ही अविश्वसनीय कामगिरी आहे,’’ असे संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी संध्याचे कौतुक करताना सांगितले. जयपूर येथे झालेल्या मागील राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत संध्याने तीन सुवर्णपदके जिंकली होती, तसेच राष्ट्रीय पातळीवरही तिने पदके पटकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com