IPL Auction 2023: 'जिथून सुरुवात झाली...', सर्वात महागडा ठरलेल्या सॅम करनची पहिली प्रतिक्रिया

आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरलेल्या सॅम करनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Sam Curran
Sam Curran Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 लिलाव कोचीमध्ये शुक्रवारी पार पडला. या लिलावात अनेक विक्रमी बोली लागल्या. त्यातही इंग्लंडचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनच्या लिलावाने इतिहास घडवला.

सॅम करनला मोठी लागेल, याचा अंदाज अनेकांना लिलावाआधी होता. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला आणि सॅम करनला तब्बल 18.50 कोटींची बोली लागली. त्याला संघात घेण्यासाठी जवळपास सर्वच संघ उत्सुक होते. त्यातही चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चांगलीच चुरस लागली होती.

Sam Curran
IPL Auction 2023 मध्ये करोडपती बनलेला जम्मू-काश्मीरचा 'हा' धाकड तुम्हाला माहितीये का?

पण, अखेर पंजाब किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आता याबद्दल सॅम करनने प्रतिक्रिया दिली आहे. सॅम करन यापूर्वी 2019 साली आयपीएल हंगामात पंजाब किंग्सकडून खेळला होता. त्याने पंजाब किंग्स संघाकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

सॅमला संघात घेतल्यानंतर पंजाब किंग्सने ट्वीट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सॅम करनने लिहिले की 'जिथून सुरुवात झालेली पुन्हा तिथेच. पंजाब किंग्समध्ये येण्यासाठी उत्सुक आहे.'

सॅम करनने पंजाब किंग्सनंतर आयपीएल 2020 आणि 2021 हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर गेल्या हंगामातून तो दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्यामुळे आयपीएल 2023 लिलावात तो सहभागी झालेला.

सॅमने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 32 सामने खेळले असून 337 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 32 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. तसेच तो या वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात तो सामनावीरही ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com