Goa Pro-League Football : साळगावकर एफसीचा स्पोर्टिंग क्लब द गोवावर निसटता विजय

धेंपो क्लबने चर्चिल ब्रदर्सला गोलबरोबरीत रोखले
Brian Faria
Brian FariaDainik Gomantak

Goa Pro-League Football : साळगावकर एफसीने दोन गोलच्या पिछाडीवरून उत्तरार्धात मुसंडी मारत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघावर 3-2 अशी निसटती मात केली.

सामना शनिवारी नागोवा येथील मैदानावर झाला. धुळेर-म्हापसा येथे धेंपो स्पोर्टस क्लबने चर्चिल ब्रदर्सला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

Brian Faria
U19 Women's T20 WC: 'सेलिब्रेटी बनल्यावर लक्षात ठेवा...', नीरज चोप्राचा टीम इंडियाला बहुमोल सल्ला

साळगावकर एफसीने 25व्या मिनिटास मार्क कार्व्हालो याच्या गोलमुळे आघाडी घेतली होती, मात्र पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये स्पोर्टिंगने दोन गोल करून 2-1 अशी आघाडी प्राप्त केली. चंदन गावस याने 45+1व्या मिनिटास, तर रिची वाझ याने 45+3व्या मिनिटास गोल नोंदविला.

नंतर 78व्या मिनिटास सॅम्युएल कॉस्ता याने, तर 90+3व्या मिनिटास अंतुश मोनिझ याने केलेल्या गोलमुळे साळगावकर एफसीने विजयाची तीन गुण खाती जमा केले. सॅम्युएल सामन्याचा मानकरी ठरला.

Brian Faria
U19 Women's T20 WC: बर्थडे गिफ्ट म्हणून 'ती' एकच गोष्टच पाहिजे, शफालीची टीम इंडियाकडे स्पेशल मागणी

अन्य सामन्यात माल्सॉमडॉँगकिमा याने 45+2व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला विश्रांतीला एका गोलने पुढे होता. 65व्या मिनिटास बेनेस्टन बार्रेटो याने धेंपो क्लबला बरोबरी साधून दिली. त्यांचा ब्रायन फारिया सामन्याचा मानकरी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com