सप्टेंबरमध्ये होणारा Asia Cup रद्द होणार का? महत्त्वाची अपडेट्स आले समोर...

आशिया चषक 2023 च्या आयोजनाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
India vs Pakistan | Asia Cup 2023
India vs Pakistan | Asia Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या आयोजनाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यातच काही पाकिस्तानी मीडियानुसार असे समोर आले होते की ही स्पर्धा रद्द होऊ शकते. पण आता याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आशिया चषक रद्द होण्याच्या चर्चेचे आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) सुत्रांनी खंडन केले आहे. खरंतर आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहेत. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये खेळली जाणार आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता.

त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनामवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण नंतर असा सुवर्णमध्यही काढण्यात आला होता की भारतीय संघ पाकिस्तानला न जाता तटस्थ ठिकाणी सामने खेळेल. तर अन्य संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होते. सध्यातरी याचनुसार स्पर्धा होण्याची दाट शक्यता आहे.

India vs Pakistan | Asia Cup 2023
IPL 2023: पंजाबविरुद्ध का झाला पराभव? CSK कॅप्टन धोनीने स्पष्टच सांगितले की...

याबद्दल एसीसीच्या सुत्राने पीटीआयला माहिती दिली की 'मेसेजेसचे आदान-प्रदान झाले आहे. पण अशिया चषक पुढे ढकल्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही किंवा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर आशिया चषक रद्द झाला, तर सर्वात आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवले जाईल. पण असं काही अद्याप झालेले नाही. त्याचबरोबर एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही याबद्दल कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.'

'ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी एसीसीला कार्यकारी मंडळाची बैठक घ्यावी लागेल. अध्यक्ष सात दिवसामध्ये या बैठकीचा निर्णय घेऊ शकतात. सध्यातरी अशा बैठकीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.'

India vs Pakistan | Asia Cup 2023
IPL 2023: मुंबई इंडियन्सची ताकद वाढणार! 'या' वेगवान गोलंदाजाची होणार टीममध्ये एन्ट्री

सुत्राने पुढे सांगितले, 'हे पाहा, जर कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर आशिया चषक रद्द झाला, तर त्याचा परिणाम पाकिस्तानच्या वर्ल्डकपमधील सहभागावरच नाही, तर पाकिस्तानच्या भविष्यातील वेळात्रकावर आणि त्यांच्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगदेशबरोबरील द्विपक्षीय नात्यावरही होईल. परिस्थिती नाजूक आहे.'

दरम्यान, याबद्दल एसीसीकडून याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com