भारतीय महिला क्रिकेट संघाची पूर्व कर्णधार मिताली राजनंतर आता रुमेली धरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 38 वर्षीय रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिच्या 15 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केला. धरने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत ती भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती, ज्यामध्ये तिने 4 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. (Rumeli Dhar announces retirement from international cricket)
दरम्यान, इन्स्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देताना रुमेली धरने (Rumeli Dhar) लिहिले की, 'पश्चिम बंगालच्या (West Bengal) श्यामनगर येथून सुरु झालेला माझा 23 वर्षांचा क्रिकेट प्रवास अखेर संपत आहे. मी सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणे आणि 2005 च्या अंतिम फेरीत पोहोचणे माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय होते. या प्रवासात माझी कारकीर्दही अनेकदा दुखापतीमुळे रुळावरुन घसरली. पण, प्रत्येक वेळी मी अधिक ताकदीने परदतले. बीसीसीआय, मित्र आणि सहकारी खेळाडूंनी केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते.'
तसेच, धरने भारतासाठी (India) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) विरुद्धच्या तिरंगी T20 मालिकेत खेळला. त्या मालिकेत, ती 6 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघात परतली, जेव्हा ती 34 वर्षांची होती.
शिवाय, रुमेली यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 29.50 च्या सरासरीने 236 धावा केल्या आणि 21.75 च्या सरासरीने आठ विकेट घेतल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 19.61 च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह 961 धावा केल्या. याशिवाय तिने 27.38 च्या सरासरीने 63 विकेट्स घेतल्या. रुमेलीने 18.71 च्या वेगाने 131 धावा केल्या आणि 23.30 च्या वेगाने 13 विकेट घेतल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाबाद 66 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.