IPL 2023: RCB नं मारलं हैदराबादचं मैदान, किंग कोहलीच्या शतकासमोर सनरायझर्सचा पालापाचोळा

IPL 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हेन्रिक क्लासेनच्या शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या.

प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीचे शतक आणि फॅफ आणि त्याच्यातील 172 धावांच्या भागीदारीमुळे 5 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या (Royal Challengers Bangalore) या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना हेन्रिक क्लासेनच्या शतकाच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. क्लासेन 51 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा करुन बाद झाला.

Virat Kohli
IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

हैदराबादमध्ये 2 शतके

हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी दोन शतके पाहायला मिळाली. पहिले सनरायझर्स हैदराबादसाठी, यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावांची तूफानी खेळी खेळली, ज्यामुळे हैदराबादने 5 विकेट्सवर 186 धावा केल्या.

यानंतर विराट कोहलीने ओपनिंग करताना शतक झळकावले. बंगळुरुने 19.2 षटकांत 2 गडी गमावून विजय मिळवला.

विराटने 100 तर कर्णधार फाफ डुप्लेसीने ताबडतोब 71 धावा केल्या. तर हैदराबादकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी 1-1 विकेट घेतली.

क्लासेनने ताकद दाखवली

तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेन्रिक क्लासेनने शानदार शतक झळकावले, त्याने 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह 104 धावा केल्या.

कर्णधार एडन मार्कराम (18) सोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी 76 धावांची आणि हॅरी ब्रूकसोबत (नाबाद 27) चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.

सनरायझर्सच्या डावात क्लासेनच्या वर्चस्वाचा अंदाज यावरुन लावता येतो की, त्याने 51 चेंडूत 104 धावा केल्या, तर संघाचे उर्वरित फलंदाज 69 चेंडूत केवळ 82 धावाच करु शकले.

Virat Kohli
IPL 2023: प्लेऑफ सामन्यापूर्वी लखनऊ संघाची मोठी घोषणा, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडणार

ब्रेसवेल आणि सिराज आरसीबीसाठी चमकले

आरसीबीसाठी मायकेल ब्रेसवेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 13 धावांत 2 बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत 17 धावा देत एक बळी घेतला. तर कर्ण शर्माने तीन षटकांत 45 धावा दिल्या, मात्र त्याला यश मिळू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com