अबुधाबी- आयपीएलमध्ये फारसा नावाजलेल्या नसलेल्या मोहम्मद सिराजने दोन निर्धाव षटकात तिघांना बाद करीत कोलकाता नाईट रायडर्सचे कंबरडे मोडले आणि त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला विजयासाठी फारसा संघर्षही करावा लागला नाही.
आयपीएलमध्ये षटकामागे दहापेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग होतो, असा लौकिक; पण या सामन्यात कोलकातास षटकामागे चारच्या गतीने धावा केल्याचे समाधान लाभले. त्यांच्या डावातील सर्वोत्तम भागीदारी आठव्या विकेटसाठी झाली. पॉवरप्लेच्या सुरुवातीच्या साडेतीन षटकातच कोलकाताचे चार फलंदाज परतले. त्यावेळी आयपीएलमध्ये गोलंदाजांचे विरळाच दिसलेले वर्चस्व अनुभवता आले.
अवघ्या ८५ धावांचे लक्ष्य बंगळूरने ३९ चेंडू राखूनच पार केले. कोहलीला हे घडत असताना आपण नाणेफेक हरलो, याचे समाधान असेल. सिराजने कोहलीला याचा आनंद देतान प्रथम त्रिपाठीस चकवले. राणाच्या आखूड टप्प्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या आणि टॉम बॅंटनलाही चकवले. सिराजने हे सर्व एकही धाव न देता केले. त्यानंतर बंगळूरच्या गोलंदाजांनी कोलकातावरील पकड कधीही निसटणार नाही, याचीच काळजी घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.