VIDEO: रोवमॅन पॉवेलचा 'सुपरमॅन' अवतार! हवेत पाच फूट उंच उडी मारुन घेतला अफलातून कॅच; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Rovman Powell Incredible Catch: केकेआरचा अष्टपैलू खेळाडू रोवमॅन पॉवेलने हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेनचा असा काही कॅच घेतला की, ज्याची चर्चा आता जगभर होत आहे.
Rovman Powell Incredible Catch
Rovman PowellDainik Gomantak
Published on
Updated on

Rovman Powell Incredible Catch: आयपीएल 2026 मध्ये रविवारी (3 मे) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात एक अविश्वसनीय क्षण पाहायला मिळाला. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू रोवमॅन पॉवेलने हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेनचा असा काही कॅच घेतला की, ज्याची चर्चा आता जगभर होत आहे. पॉवेलच्या या 'वन हॅन्डेड' अप्रतिम क्षेत्रक्षणामुळे क्लासेनला अवघ्या 11 धावांवर तंबूत परतावे लागले आणि हैदराबादचा डाव गडगडला.

सामन्यातील 11व्या षटकात हा थरार पाहायला मिळाला. कॅमेरन ग्रीनने टाकलेल्या चेंडूवर क्लासेनने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूची टायमिंग चुकल्याने तो लेग-साइडला हवेत उडाला. डीप मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पॉवेलने आपल्या उजव्या बाजूला धावत जाऊन हवेत चित्तथरारक उडी घेतली आणि चेंडू एका हातात अडकवला. जमिनीवर पडल्यानंतरही त्याने चेंडूवरची पकड सुटू दिली नाही. टीव्ही पंचांनी बारकाईने तपासणी केल्यानंतर याला 'फेअर कॅच' घोषित केले. विशेष म्हणजे, हा चित्तथरारक कॅच पकडताना पॉवेलचा हजारो रुपयांचा सनग्लासही फुटला.

Rovman Powell Incredible Catch
MI vs KKR: मुंबई इंडियन्सची 'फर्स्ट मॅच' देवाला? वानखेडेवर कोलकाताविरुद्ध रंगणार 'हायव्होल्टेज' थरार

सामन्यानंतर बोलताना पॉवेल म्हणाला की, "असे कॅच तेव्हाच पकडले जातात जेव्हा तुमचे हात चांगले असतात!" त्याने गोलंदाजांचे कौतुक करताना सांगितले की, स्पर्धेची सुरुवात हवी तशी झाली नव्हती, त्यामुळे अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची संघाला गरज होती. पॉवेलच्या या चपळाईमुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ 19 षटकांत 165 धावांत गारद झाला. उत्तरादाखल कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 18.2 षटकांत 169 धावा करत 7 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. 3 बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com