Naorem Roshibina Devi: 'मणिपूर जळतंय, माझं मेडल त्या लोकांसाठी ज्यांनी...', रोशिबिना देवी भावूक

Manipur Violence: आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रोशिबिना देवीने मणिपूरमधील हिंसाचार अस्वस्थ करत असल्याचे म्हटले आहे.
Roshibina Devi
Roshibina DeviTwitter

Roshibina Devi talking about violence in Manipur after winning silver medal in 19th Asian Games Hangzhou:

चीनमध्ये सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोशिबिना देवी हिने वुशू या खेळात रौप्य पदक जिंकत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. तिला महिलांच्या 60 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

भारतातील मणिपूर राज्यातील रहिवासी असलेल्या रोशिबिना देवी हिचे हे एशियाडमधील दुसरे पदक ठरले. यापूर्वी तिने 2018 साली जकार्ताला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.

दरम्यान, यंदा तिची सुवर्णपदक जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली, याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली. पण याबरोबरच तिने मणिपूर हिंसाचारावरही भाष्य केले. रोशिबिनाने तिचे रौप्य पदक मणिपूरमधील लोकांना समर्पित केले आहे. यावेळी तिने तिच्या कुटुंबियांच्या काळजी तिला अस्वस्थ करत असल्याचेही सांगितले.

Roshibina Devi
Asian Games: ऋतुराजच्या नेतृत्वातील टीम इंडिया चीनला रवाना, कधी आणि केव्हा होणार सामने?

मणिपूर हिंसाचार प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे.

याबद्दल प्रसारणकर्ते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना रोशिबिना देवी म्हणाली, 'सध्या मला माहित नाही आमच्याबरोबर काय होणार आहे. सध्या सर्व घाबरलेले आहेत. मला आशा आहे की गोष्टी पुन्हा सामन्य होतील आणि पूर्वीपेक्षा चांगल्या होतील व आपण शांततेत राहू.'

'सध्या सर्व गोष्टी जळताना दिसत आहेत, हे खूप चांगले वाटत नाहीये. मी तिथे जाऊन मदत करू शकत नाही. मला माझे हे पदक त्या सर्वांना समर्पित करायचे आहे, जे आमची सुरक्षा करत आहेत आणि आमच्यासाठी लढत आहेत.'

Roshibina Devi
Asian Games: भारतीय नेमबाजांचा सहाव्या दिवशीही अचूक नेम, वर्ल्ड रेकॉर्ड्ससह मेडल नावावर

दरम्यान, सध्या रोशिबिना तिच्या खेळासाठी घरापासून दूर आहे. पण तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तिला मणिपूरमधील वातावरणाने विचलित होण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

रोशिबिना पीटीआयशी बोलताना म्हणाली, 'कधीही काहीही होऊ शकते. माझ्या कुटुंबातील किंवा नातेवाईक या हिंसाचाराने प्रभावित झालेला नाही, पण माझे गाव जवळपास 5 महिन्यांपासून हिंसक घटनांचा सामना करत आहे. मणिपूर मे महिन्यापासून अडचणीत आहे. कधीही काहीही होऊ शकत असल्याने मला माझ्या पालकांची आणि भावंडांची काळजी वाटते.'

'वादामुळे हिंसाचार थांबलेला नाही, तो फक्त वाढतच आहे. मला माहित नाही हे कधी थांबणार आहे. मी याबद्दल जास्त विचार न करण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा माझ्यावर परिणाम होतो.'

दरम्यान, रोशिबिनाचे आई-वडील सध्या गावाची सुरक्षा करण्यासाठी योगदानही देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com