आयपीएलमध्ये हॉटस्पॉट का नाही? रोहित शर्माच्या विकेटवरून वाद

निर्णयात चूक कोणाची?
rohit sharma wicket controversy hot spot third umpire decision mumbai indians ipl 2022
rohit sharma wicket controversy hot spot third umpire decision mumbai indians ipl 2022 Danik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांचा सामना झाला. मुंबईला मोसमातील 9व्या पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र या पराभवाशिवाय नव्या वादाला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ज्या पद्धतीने बाद करण्यात आले त्यावरून वाद निर्माण झाला आहे. रोहित शर्माच्या बॅटला चेंडू लागला नाही, पण तो बाद घोषित झाला. (rohit sharma wicket controversy hot spot third umpire decision mumbai indians ipl 2022)

रोहित शर्माच्या या विकेटवरून वाद निर्माण झाला असून चाहत्यांचा संताप पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे की आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट लीग मानली जाते परंतु येथे अशा खालच्या पातळीवर अंपायरिंग केले जात आहे, तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जात नाही.

rohit sharma wicket controversy hot spot third umpire decision mumbai indians ipl 2022
जसप्रीतने मोडले KKRचे कंबरडे, 9 बॉल 5 विकेट, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगीरी

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मुंबई इंडियन्सच्या डावातील पहिल्याच षटकात टीम साऊदीच्या चेंडूवर रोहित शर्माला बाद घोषित करण्यात आले. रोहित शर्माच्या बॅटजवळून चेंडू बाहेर आला, त्याने या निर्णयावर आक्षेप घेतला. फील्ड अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत रोहित शर्मा तिसऱ्या पंचाकडे वळला, पण असे असताना चेंडू बॅटपासून लांब असल्याचे दिसून आले.

अंपायरने त्याला आऊट घोषित केले, या निर्णयावर रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि स्टँडवर बसलेले संघ मालक आकाश अंबानी यांच्यासह इतर प्रेक्षक, समालोचकही आश्चर्यचकित झाले. रोहित शर्माची विकेट पडल्याने मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आणि संघाला सामना गमवावा लागला.

निर्णयात चूक कोणाची?

अल्ट्रा एज या तंत्राने बॅट आणि बॉलचा संपर्क ऐकू येतो. स्क्रीनवर स्पाइक दिसल्यास, चेंडूने त्या जागेला स्पर्श केला आहे. मग ती बॅट असो, पॅड असो किंवा बॅट्समनची बॉडी असो. परंतु त्याचा नकारात्मक मुद्दा असा आहे की स्पाइक कोणत्याही प्रकारच्या आवाजावर येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com