World Cup 2023: जळायचं तरी किती... आता रोहितच्या टॉसिंग पद्धतीवरही पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला प्रश्न उपस्थित

Pakistan Former Player Sikander Bakht: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू त्यांच्या विरोधाभासी वक्तव्याने आपलेच हसू करुन घेत आहेत.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, परंतु पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू त्यांच्या विरोधाभासी वक्तव्याने आपले हसू करुन घेत आहेत. हसन रझा यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलल्याची तक्रार केली होती.

यातच आता, यापुढे एक पाऊल टाकत माजी पाकिस्तानी खेळाडू सिकंदर बख्त यांनी लाजिरवाणे वक्तव्य केले आहे. त्यांनी रोहित शर्माच्या टॉस करण्याच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे हे वक्तव्य पूर्णपणे निराधार आहे.

बख्त यांनी त्यांच्या एक्स हँडलवर यासंबंधीचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यानंतर यूजर्संनी पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञावर जोरदार टीका केली.

सिकंदर बख्त यांचे बेताल वक्तव्य

दरम्यान, एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना सिकंदर बख्त यांनी हे बेताल वक्तव्य केले. बख्त म्हणाले की, नाणेफेकीदरम्यान रोहित शर्मा नाणे खूप दूर फेकतो, त्यामुळे विरोधी कर्णधाराला ते दिसत नाही. पण हे वक्तव्य करण्यापूर्वी सिकंदर बख्त नाणेफेकीच्या वेळी सामनाधिकारीही उपस्थित असतात हे विसरले असावेत.

सहसा, नाणेफेकीदरम्यान, सामनाधिकारी हेड आले की टेल पाहतात. त्यामुळे सिकंदर बख्त यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा होत असून त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयानंतर सिकंदर यांनी हे वक्तव्य केले आहे.

भारताने (India) चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणे कदाचित पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना पचनी पडलेले दिसत नाही.

Rohit Sharma
World Cup 2023: शानदार शमी! सेमी-फायनलमध्ये 7 विकेटस घेत 'या' 7 रेकॉर्ड्सलाही घातली गवसणी

शमीने हसन रझा यांची बोलती बंद केली होती

सिकंदर यांच्या आधी हसन रझा यांनी भारताच्या गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलल्याचा मूर्खपणाचा आरोप केला होता. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयची मिलीभगत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. यावर मोहम्मद शमीने हसन रझा यांचा चांगलाच समाचार घेतला होता.

शमीने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, 'तुमच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करा.' संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली हे विशेष. मोहम्मद शमी (Mohammed Shami) 23 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहने 18, रवींद्र जडेजाने 16 आणि कुलदीप यादवने 15 विकेट्स घेतल्या आहेत.

Rohit Sharma
World Cup 2023: श्रेयस अय्यरची करिष्माई खेळी; वर्ल्ड कपमधील सलग दुसरे शतक झळकावत मोडले अनेक रेकॉर्ड!

खेळपट्टीवरुनही वाद

इतकेच नाही तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडेवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीही खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता. माजी क्रिकेटपटूंनी यावर अनेक वक्तव्ये केली.

त्याचवेळी, न्यूझीलंडच्या प्रसारमाध्यमांनाही पराभव पचवता आला नाही आणि त्यांनी खेळपट्टीबाबत आलेल्या बातम्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली. मात्र, खेळपट्टीबाबत असा कोणताही वाद नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते.

उपांत्य फेरीचा सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार हे त्यांना माहीत होते. मोठ्या टूर्नामेंटमध्ये असे होणे ही मोठी गोष्ट नाही, असेही आयसीसीने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com