IND vs AFG: '...तेव्हा तुम्ही वैतागताच', रनआऊटनंतर गिलवर चिडल्याबद्दल रोहितने दिली प्रतिक्रिया

Rohit Sharma: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुन्यावर धावबाद झाल्याबद्दल रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
Shubman Gill - Rohit Sharma
Shubman Gill - Rohit SharmaANI

Rohit Sharma reacted on furious at Shubman Gill after run out in India vs Afghanistan 1st T20I at Mohali:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारी (11 जानेवारी) टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. मोहालीला पार पडलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्माच्या धावबादची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पण त्यानेच या सामन्यानंतर याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल उतरले. अफगाणिस्तानकडून पहिले षटक फझलहक फारुकी टाकत होता.

Shubman Gill - Rohit Sharma
IND vs AFG: जयस्वाल का खेळला नाही पहिला T20I सामना? BCCI कडूनच मोठा खुलासा

या षटकाचा पहिला चेंडू रोहितने खेळून काढला. त्यानंतर दुसरा चेंडू रोहितने खेळल्यानंतर एकेरी धावेसाठी गिलला कॉल दिला. मात्र चेंडूकडे बघत असलेल्या गिलने धाव घेण्यासाठी नकार दिला, पण त्यावेळी रोहित नॉन-स्ट्रायकरकडे पळत असल्याचे त्याने पाहिलेच नाही.

त्यामुळे गोंधळ झाल्याने अखेर रोहितला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. त्यावेळी रोहित गिलवर चिडलेलाही दिसला.

दरम्यान, सामना भारताने जिंकल्यानंतर रोहित त्याच्या धावबादबद्दल म्हणाला, 'अशा गोष्टी होतात. जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा तुम्ही वैतागता, कारण तुम्हाला खेळपट्टीवर थांबून संघासाठी धावा करायच्या असतात.

मात्र, सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडत नाही. आम्ही सामना जिंकलो, हे जास्त महत्त्वाचे होते. मला गिलने पुढे खेळत रहावे असे वाटत होते, पण दुर्दैवाने तो एक चांगली छोटेखानी खेळी करून बाद झाला.'

Shubman Gill - Rohit Sharma
IND Vs AFG: अफगाणिस्तानने भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कामगिरी; 14 वर्षे जुन्या विक्रमाशी साधली बरोबरी

दरम्यान, गिलने 23 धावांची खेळी केली. रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर शिवम दुबेने शानदार अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या.

त्याला तिलक वर्मा (26), जितेश शर्मा (31) आणि रिंकू सिंग (16*) यांनी चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 158 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मग नबीने 42 धावांची खेळी केली. तसेच अन्य खेळाडूंनीही छोटेखानी खेळी केल्या. भारताकडून गोलंदाजीत मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शिवम दुबेने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com