Asia Cup: हिट मॅनने आणखी 1 रन काढली असती तर या फॉरमॅटमध्ये बनला असता नंबर वन

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 चा दुसरा सामना रविवारी दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 चा दुसरा सामना रविवारी दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्ट्रगल करताना दिसला. मात्र, टीम इंडियाने हा सामना 5 विकेटने जिंकला, परंतु रोहित 18 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. त्याने आणखी एक धाव घेतली असती तर त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला असता.

दरम्यान, रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा करण्याचा पराक्रम केला असता, परंतु तो हा आकडा केवळ 1 रनने चुकला. रोहित 12 ऐवजी 13 धावा करुन बाद झाला असता तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला असता. त्याच्याआधी महिला क्रिकेटमध्ये ही कामगिरी न्यूझीलंडच्या (New Zealand) सुझी बेट्सने केली आहे.

Rohit Sharma
Asia Cup 2022: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी काय म्हणाले, रोहित, राहुल आणि विराट

दुसरीकडे, रोहित शर्माने (Rohit Sharma) एक विक्रम आपल्या नावावर नक्कीच केला. आशिया चषक स्पर्धेत भारताकडून (India) सर्वाधिक वेळा खेळणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित सातव्यांदा आशिया चषक खेळण्यासाठी मैदानात उतरला असून यापेक्षा जास्त आशिया कप खेळलेला नाही. त्याच्या आधी एमएस धोनीने 6 वेळा आशिया कप खेळला आहे. धोनीशिवाय इतरही अनेक खेळाडू आहेत, जे भारताकडून 6 वेळा आशिया कपमध्ये खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com