

Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने तुफानी फटकेबाजी करत शानदार शतकी खेळी साकारली. या शतकासह त्याने आपल्या फॉर्मवर आणि निवृत्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सचे तोंड बंद केले. लॉर्ड्स वनडे सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरुन सांगितले जात होते की, हा सामना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. मात्र, या सर्व अफवांना आणि चर्चांना आता खुद्द 'हिटमॅन'ने आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिले.
लॉर्ड्सवर दमदार शतक झळकावल्यानंतर बीसीसीआय (BCCI) ला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहितने स्पष्ट केले की, ''मैदानावर बॅटने धावा काढणे आणि आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच त्याचे खरे काम आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याला हेच करण्यास सांगितले गेले आणि तो पुढेही हेच करत राहील. वेळोवेळी त्याच्या फॉर्म तसेच निवृत्तीबद्दल चर्चा होत आल्या. मात्र जोपर्यंत तो क्रिकेट खेळत राहील, तोपर्यंत या गोष्टी अशाच चालू राहतील, त्यामुळे त्याला या सगळ्याचा काहीही फरक पडत नाही.''
रोहितच्या मते, तो मैदानावर काय करतो आणि संघाच्या विजयात किती योगदान देतो, हेच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. बाहेर होणारा हा गोंधळ आणि शंका अशाच राहू द्या, कारण थोडा गोंधळ आणि चर्चा नसेल तर खेळात मजा कशी येईल, असेही तो मिश्किलपणे म्हणाला.
या मुलाखतीदरम्यान रोहितने विराट कोहलीसोबतच्या बॉण्डिंगवरही मोकळेपणाने भाष्य केले. विराटसोबत फलंदाजी करण्याचा अनुभव नेहमीच अप्रतिम असतो, असे सांगताना रोहित म्हणाला की, दोघांनीही एकमेकांची कारकीर्द पाहिली आहे. मैदानावर त्यांच्यात अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक भागीदाऱ्या झाल्या असून ते एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. सामन्यादरम्यान एकमेकांशी नवनवीन रणनीती शेअर करणे आणि संघाच्या विजयासाठी काय चांगले करता येईल याचा एकत्र विचार करणे, हा नेहमीच एक उत्तम आणि खास अनुभव राहिला असल्याचे रोहितने आवर्जून नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.