PSL, Tim David Consecutive Six: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवार, 9 मार्चपासून सुरु होत आहे.
मालिकेतील 3 सामने झाले असून टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. आता चौथा कसोटी सामना उद्यापासून म्हणजेच 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
दरम्यान, रोहितच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याने मैदानावर आपला जलवा दाखवून दिला आहे.
पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या एका सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सहकारी खेळाडूने आपला जलवा दाखवून दिला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टिम डेव्हिड आहे.
टीम डेव्हिड आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. टीम डेव्हिडने पीएसएल सामन्यात 222 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने अवघ्या 27 चेंडूत 60 धावा केल्या. तरीही त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
आपल्या पॉवर हिटिंगने सर्वांना चकित करणाऱ्या टीम डेव्हिडने मुलतान सुलतानसाठी धडाकेबाज खेळी केली. इस्लामाबाद युनायटेडविरुद्धच्या सामन्यात त्याने रुमन रईसच्या एका षटकात सलग 4 षटकार ठोकले.
मात्र, टीम डेव्हिडच्या शानदार खेळीनंतरही मुलतान सुलतानला सामन्यात एक चेंडू शिल्लक असताना 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
यासंबंधीचा व्हिडिओ पीएसएलनेच सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. रईसच्या या षटकात एकूण 30 धावा झाल्या.
यामध्ये दाऊदने 4 षटकार तर शान मसूदने एक चौकार लगावला. रईसच्या षटकातील पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर पुढच्या चेंडूवर शान मसूदने चौकार मारला. दुस-या चेंडूवर सिंगल घेत डेव्हिडला स्ट्राईक दिली.
तेवढ्यात टीम डेव्हिडच्या बॅटने आग ओकायला सुरुवात केली. त्याने सलग 4 षटकार ठोकले. त्याने या सामन्यात केवळ 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मुलतान सुलतानने 20 षटकांत 205 धावा केल्या, त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडने 19.5 षटकांत लक्ष्य गाठले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.