MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals: रोहित आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला असून त्याने या लीगमध्ये आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals
Rohit Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals: आयपीएल 2026 च्या आठव्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी केली. यादरम्यान स्टार अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. धावसंख्येच्या दृष्टीने ही खेळी मोठी नसली तरी, रोहितने या खेळीदरम्यान आयपीएलच्या इतिहासात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. रोहित आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला असून त्याने या लीगमध्ये आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

आयपीएलमध्ये एखाद्या विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत अव्वल दोन स्थानांवर 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचे नाव आहे. गेलने पंजाब किंग्सविरुद्ध 61 आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 54 षटकार मारले आहेत.

Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals
IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

रोहितने दिल्लीविरुद्ध आपला 51वा षटकार खेचून ख्रिस गेलच्या विक्रमाच्या दिशेने पाऊल टाकले. रोहितनंतर या यादीत महेंद्रसिंह धोनीचे नाव येते, ज्याने आरसीबीविरुद्ध 50 षटकार मारले आहेत. तसेच विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 48 षटकार मारले असून तो रोहितच्या मागे आहे.

केवळ षटकारांचा पाऊस पाडूनच रोहित थांबला नाही, तर त्याने दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात आयपीएलमधील आपल्या 100 व्या '30 प्लस' स्कोअरचा टप्पाही ओलांडला. आयपीएलमध्ये 100 वेळा 30 पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा विक्रम करणारा रोहित हा दुसरा फलंदाज ठरला. या यादीत विराट कोहली 127 अशा खेळींसह पहिल्या क्रमांकावर असून रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितची सातत्यपूर्ण कामगिरी मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच जमेची बाजू ठरली आणि या सामन्यातून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो विक्रमांचा बादशहा का आहे.

Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals
IPL 2026: मुंबई इंडियन्स, हैदराबाद... 'या' 4 संघांचं 'प्लेऑफ'मधील स्थान पक्कं; दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहितला मोठ्या धावसंख्येची संधी होती, परंतु सेट झाल्यावर त्याने आपली विकेट गमावली. त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. फिरकीपटू अक्षर पटेलने त्याला बाद केले. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये अक्षर पटेलने रोहितला बाद करण्याची ही चौथी वेळ आहे. अक्षरविरुद्ध रोहितचा स्ट्राईक रेट काहीसा संथ (87.01) राहिला आहे.

Rohit Sharma 50 Sixes Against Delhi Capitals
Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

याआधी चालू हंगामाच्या पहिल्याच सामन्यात रोहितने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 38 चेंडूत 87 धावांची तुफानी अर्धशतकी खेळी खेळली होती. रोहितचा हाच फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी आगामी सामन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्याच्या बॅटमधून निघणारे हे रेकार्ड चाहत्यांसाठी पर्वणी ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com