India vs New Zealand, 3rd ODI Playing 11: भारतीय संघाने टी-20 नंतर न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहितने दोन सर्वोत्तम खेळाडूंना विश्रांती देण्याचे संकेत दिले आहेत.
भारताला पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS कसोटी) खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.
कर्णधार रोहित शर्माने यासाठी तयारी केली आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडेत मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचे संकेत दिले आहेत.
रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, 'गेल्या पाच सामन्यांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आमच्या खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. शमी आणि सिराज लांब स्पेल टाकण्यासाठी खूप उत्सुक होते पण मी त्यांना आठवण करुन दिली की एक कसोटी मालिका देखील येत आहे, त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.'
दुसऱ्या वनडेतही रोहितला या दोन गोलंदाजांकडून केवळ 12 षटके मिळाली. जिथे शमीने 6 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी सिराजने तेवढीच षटके टाकल्यानंतर केवळ 10 धावा देत एक बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोन्ही गोलंदाजांना संधी द्यायची आहे, असे रोहितने सामन्यानंतर स्पष्ट केले. त्यामुळे इंदूर येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत उमरान मलिकला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.