Rohit Sharma: कोणीच योग्य प्रश्न का विचारत नाही?

रोहित शर्मा पहिल्यांदाच पांढऱ्या कपड्यांमध्ये सांभाळणार टीम इंडियाची कमान
Rohit Sharma
Rohit Sharmadainikgomantak
Published on
Updated on

Rohit Sharma: टीम इंडिया मोहालीत श्रीलंकेविरुद्ध नव्या नेतृत्वासह उतरताना दिसेल. तर रोहित शर्मा कर्णधार (captain) म्हणून पहिल्यांदाच पांढऱ्या कपड्यांमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. तर रोहितही दीर्घ काळानंतर कसोटी खेळताना दिसणार आहे. रोहितने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती आणि दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला ही मुकला होता. तो त्याच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. यावेळीही रोहित आपल्या वेगळ्याच मूडमध्ये दिसला. तो यावेळी पत्रकार परिषदामध्ये पत्रकारांशी हसत चेष्टा करताना दिसला. (Rohit Sharma hilariously stated that nobody is asking him such questions)

Rohit Sharma
IND vs SA: वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

मोहालीत आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) एका पत्रकाराने रोहितला, मित्रा रोहित, आऊटफिल्डमध्ये खेळत नाहीस, विकेटबद्दल बोलत नाहीस, तू प्लेइंग इलेव्हनबद्दल ही बोलत नाहीस.' असे विचारले. त्यावर दिलखूश उत्तर देताना रोहित म्हणाला, 'यार कोणी विचारत नाही, आता कोणी विचारेल तरच मी उत्तर देईन, आणि व्वा हा खरा प्रश्न आहे...'

मोहालीत (Mohali) रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी (Test) कर्णधार (captain) म्हणून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. पुढील परदेश दौऱ्यापूर्वी त्याला चांगली टीम (Team India) बांधावी लागेल. त्याच्या समोर हे आवाहन असेल. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि ऋद्धिमान साहा यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आता युवा खेळाडूंवर अधिकाधिक बाजी मारण्याच्या मनस्थितीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com