इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) या मोसमातून जवळपास बाहेर पडला आहे. मुंबईने पहिले आठ सामने गमावले आहेत, हा एक विक्रम आहे. या लाजिरवाण्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला असून सोमवारी त्याने चाहत्यांसाठी एक ट्विटही केले आहे.
रोहित शर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही या टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु खेळात असे घडते. क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज या टप्प्यातून बाहेर पडले आहेत, परंतु मला माझा संघ आणि तेथील वातावरण आवडते. मी आमच्या शुभचिंतकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि संघाप्रती अतूट निष्ठा दाखवली.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये रोहित शर्माची गणना केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सामने जिंकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी कर्णधार आहे, पण यावेळी या सर्व गोष्टी अपयशी ठरल्या.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईने सलग इतके सामने कधीच गमावले नाहीत, त्याचप्रमाणे एका हंगामाच्या सुरुवातीला कोणत्याही संघाने त्यांचे सर्व 8 सामने गमावलेले नाहीत.
कर्णधारपदच नाही तर रोहित शर्माची फलंदाजीही चिंतेचा विषय आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 8 सामन्यात केवळ 153 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार, सलामीवीर आणि सर्वात मोठा फलंदाज यांची कामगिरी अशी असेल तर संघ अडचणीत येणं साहजिकच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.