IND vs BAN: रोहितच्या बॅटिंगमुळे नाही, तर बॉलिंगमुळे अश्विनचा टीम इंडियातील पत्ता होणार कट? Video व्हायरल

Rohit Sharma Bowling: रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी गोलंदाजीचा सराव करताना दिसला होता.
Rohit Sharma Bowling
Rohit Sharma Bowling
Published on
Updated on

Rohit Sharma Bowling in Nets Ahead Of India vs Bangladesh Match in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत विरुद्ध बांगालदेश संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना गुरुवारी (19 ऑक्टोबर) रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या सराव सत्राचे एक खास आकर्षण पाहायला मिळाले, ते म्हणजे रोहित शर्माची गोलंदाजी. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुण्यात भारतीय संघ सराव करत असताना गोलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे तो सामन्यादरम्यानही गोलंदाजी करणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Rohit Sharma Bowling
Rohit Sharma: शतक एक विक्रम अनेक! हिटमॅनने सचिन-पाँटिंगसारख्या दिग्गजांना पछाडत रचले नवे 'वर्ल्ड रेकॉर्ड'

मंगळवारी नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातील एका ब्रेकदरम्यान देखील भारतीय संघाच्या सराव सत्राचे काही क्षण दाखवण्यात आले होते. यामध्ये रोहित रविंद्र जडेजाविरुद्ध गोलंदाजी करताना दिसत आहे. तसेच रोहितला आर अश्विन सल्लेही देत आहे. ते पाहून माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरची चकीत झाले होते.

समालोचन करत असताना मांजरेकर असेही म्हणाले, 'स्पर्धेच्यापूर्वीही रोहितने त्याच्या गोलंदाजीबद्दल पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय म्हणून नाही तर रोहितने यापूर्वीच याबद्दल बोलले असल्याने तो गोलंदाजी करताना दिसतोय.'

'पार्ट टाईम गोलंदाजी करू शकणारे फलंदाज संघात असणे चांगले असते. तो भारतासाठी ऑफ-स्पिनर म्हणून तीन-चार षटके गोलंदाजी करू शकला, तरी ते संघासाठी चांगले ठरेल. कारण बांगलादेश संघात चार-पाच डावखुरे फलंदाज आहेत.'

Rohit Sharma Bowling
IND vs PAK सामन्यात वाद! महिला पोलीस कर्मचारी अन् प्रेक्षक यांच्यात मारामारी, व्हिडिओ व्हायरल

तसेच मांजरेकरांनी असेही म्हटले की 'असे वाटतेय की आर अश्विनला भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करणार नाही.' त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले की अश्विन ज्याप्रकारे रोहित शर्माला मार्गदर्शन करत आहे, त्यानुसार अश्विनचा पत्ता कटू शकतो.

दरम्यान, रोहितने सामन्यांमध्ये गोलंदाजी केली, तरी ती काही पहिली वेळ नसेल. यापूर्वीही कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहित पार्ट टाईम गोलंदाजी करायचा. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 विकेट्सही घेतल्या आहेत. इतकेच नाही तर रोहितने आयपीएलमध्ये 2009 साली हॅट्रिकही घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com