IND vs PAK: हिट मॅनचा 'हिट' जलवा, वनडेत 300 षटकार मारणारा ठरला पहिला भारतीय!

World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माने आणखी मोठा रेकॉर्ड केला.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माने आणखी मोठा रेकॉर्ड केला. रोहितने शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध फटकेबाजी करत वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा टप्पा ओलांडला.

आता या यादीत रोहित शर्माच्या पुढे फक्त वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. यासह रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 हून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडला

यापूर्वी, रोहित शर्माने (Rohit Sharma) अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा 553 षटकारांचा विक्रम मोडला होता. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नवीन उल हकच्या चेंडूवर षटकार ठोकून ख्रिस गेलचा हा विक्रम मोडला.

Rohit Sharma
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराटची तळपली बॅट, रोहितचा रेकॉर्ड कसा? पाहा आकडेवारी

पाकिस्तानविरुद्ध 6 षटकार ठोकले

दरम्यान, रोहितने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 62 चेंडूत 86 धावा केल्या. यादरम्यान रोहितने आपल्या इनिंगमध्ये 6 चौकार आणि 6 षटकार मारले.

दुसरीकडे, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने 42.5 षटकांत सर्व विकेट गमावून केवळ 191 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com