Rishabh Pant: टीम इंडियाच नाही, तर दिल्ली कॅपिटल्सलाही धक्का, 'इतक्या' महिन्यांसाठी पंत क्रिकेटला दुरावणार

ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबरच आयपीएललाही मुकणार.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

Rishabh Pant: भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा शुक्रवारी सकाळी कार अपघात झाला. या अपघातात पंतला अनेक ठिकाणी दुखापती झाल्या असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीवरून रुडकीला जाताना त्याचा नारसन बॉर्डरजवळ डिव्हाडरला धडकून अपघात झाला. या अपघातानंतर त्याची बीएमडब्ल्यू कार पूर्णपणे जळाली.

या अपघातात पंतला डोक्याला दोन खोचा पडल्या आहेत. तसेच गुडघ्यामध्ये लिगामेंट टीएर आहे. तसेच उजव्या मनगटाला, घोट्याला, पायाच्या बोटांना आणि पाठीला दुखापती झाल्या आहेत. पण पंतची प्रकृती स्थिर आहे.

मात्र, या दुखापतींमुळे त्याला आता पुढील काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant Health Update: अनिल कपूर अन् अनुपम खेर पोहोचले डेहराडूनला पंतच्या भेटीला; म्हणाले...

पंतच्या प्रकृतीबद्दल एम्स-ऋषिकेश येथे स्पोर्ट्स इंज्यूरी डिपार्टमेंटमधील डॉ. कमर आझम यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना माहिती दिली आहे की 'पंतला कमीतकमी तीन ते सहा महिने लिगामेंटच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लागतील. तसेच आणखी गंभीर असेल, तर आणखी वेळ लागू शकतो. त्याच्या दुखापतीच्या रिपोर्ट्सवर पुढील गोष्टी अवलंबून असेल.'

त्यामुळे आता पंत फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबरच आगामी आयपीएल 2023 हंगामालाही मुकण्याची शक्यता आहे. पंत भारतीय कसोटी संघातील प्रमुख खेळाडू आहे. तसेच तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे भारतीय संघाबरोबरच दिल्ली कॅपिटल्स संघालाही मोठा धक्का बसला आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant Accident: पंड्या ते पाँटिंग, अपघातात जखमी झालेल्या पंतसाठी क्रिकेटविश्वातून प्रार्थना, पाहा ट्वीट्स

पंत यापूर्वी गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. या मालिकेत त्याने चांगली कामगिरी देखील केली होती. आता पंत या दुखापतीतून कधीपर्यंत सावरणार आणि कधीपर्यंत मैदानावर परतणार हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com