Rinku Singh Facebook Hacked: रिंकू सिंह सायबर क्राईमचा शिकार, फेसबूक अकाउंट हॅक; मोनेटायझेशनमधून येणारे पैसेही लंपास

Rinku Singh Facebook Hacked News: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या एका वेगळ्याच संकटात सापडला आहे.
Rinku Singh Facebook Hacked
Rinku Singh Facebook HackedDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या एका वेगळ्याच संकटात सापडला आहे. मैदानात गोलंदाजांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या रिंकूच्या अधिकृत फेसबुक पेजवर सायबर भामट्यांनी डल्ला मारला आहे. हॅकर्सनी केवळ त्याचे अकाऊंट हॅक केले नाही, तर पेजच्या मोनेटायझेशनमधून (Monetization) मिळणारा पैसाही स्वतःच्या खात्यात वळवला आहे. याप्रकरणी रिंकूचा भाऊ सोनू सिंह याने अलीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (SSP) धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

रिंकू सिंह सध्या भारतीय क्रिकेट संघासोबतच्या सामन्यांमध्ये व्यस्त आहे. या व्यस्ततेचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्याचे १६ लाख (१.६ मिलियन) फॉलोअर्स असलेले फेसबुक पेज हॅक केले.

रिंकू क्रिकेट सामन्यांमुळे तो बऱ्याच काळापासून फेसबुकवर सक्रिय नव्हता. मात्र, ४ फेब्रुवारी रोजी जेव्हा त्याने आपले अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा पासवर्ड आणि एक्सेस चुकीचा असल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे, रिंकूने कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले नसतानाही त्याच्या अकाऊंटवरून आपोआप पोस्ट शेअर होत होत्या.

रिंकूचे फेसबुक पेज मोनेटायझ असल्याने त्यावरून त्याला मोठी कमाई होत होती. हॅकर्सनी चलाखीने रिंकूची मूळ ईमेल आयडी (rinkukumar344.8.7) बदलून त्याऐवजी दुसरी ईमेल आयडी (commercial.rinkukumar) लिंक केली. यामुळे व्हिडिओला मिळणाऱ्या व्ह्यूजचा सर्व पैसा आता रिंकूच्या ऐवजी थेट हॅकर्सच्या बँक खात्यात जात आहे. रिंकू सध्या मुंबईत असून त्याच्या अनुपस्थितीत त्याचा भाऊ सोनू सिंह या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.

पोलीस तपासाला वेग

अलीगड पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राईम सेलला हॅकर्सचा शोध घेण्याचे आणि रिंकूचे फेसबुक अकाऊंट लवकरात लवकर रिकव्हर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com